30 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरक्राईमनामाडोंगरीत सव्वा कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

डोंगरीत सव्वा कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

दोघांना अटक

Google News Follow

हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये मोठी मागणी असलेल्या महागड्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) डोंगरी परिसरातून अटक केली आहे. आरोपींकडून १ कोटी २४ लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा ३ किलो ५६३ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या तस्करीच्या जाळ्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आझाद मैदान युनिटचे पथक डोंगरी परिसरातील उमरखाडी क्रॉस लेन येथे गस्त घालत होते. त्यावेळी दोन व्यक्ती हातात निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना दिसल्या. पोलिसांना पाहून त्यांच्या हालचाली अधिक संशयास्पद वाटल्याने पथकाने तातडीने दोघांना ताब्यात घेतले.

त्यानंतर पंचांसमक्ष दोघांची झडती घेण्यात आली. यावेळी एका आरोपीकडे १ किलो ८२३ ग्रॅम, तर दुसऱ्या आरोपीकडे १ किलो ७४० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. अशा प्रकारे एकूण ३ किलो ५६३ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे १ कोटी २४ लाख ७० हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. हा गांजा नेमका कोठून आणण्यात आला होता, तसेच मुंबईत त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा:
आझम खान यांच्या जौहर विद्यापीठावर ईडीची कारवाई

“प्रत्येक गोष्टीत राजकारण करु नका”

‘अर्णब’ चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश-ओडिशाला तडाखा

सरन्यायाधीशांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केरळ काँग्रेसचा माफीनामा

या प्रकरणी आझाद मैदान युनिटमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी, उपनिरीक्षक राम लिंगे, सागर घाडगे आणि अन्य पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या तस्करीमागील मुख्य सूत्रधार आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा