28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरराजकारणअर्बन दिमागी नक्षल नसीरुद्दीन शाह लोकशाहीसाठी घातक!

अर्बन दिमागी नक्षल नसीरुद्दीन शाह लोकशाहीसाठी घातक!

किरेन रिजीजू यांचा घणाघात

Google News Follow

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतःला ‘दिमागी नक्षल’ म्हटल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ‘नसीरुद्दीन शाह हे धोकादायक अर्बन दिमागी नक्षल आहेत. त्यांची भूमिका भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे,’ अशा शब्दांत रिजिजू यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘नसीरुद्दीन शाह हे केवळ एक सामान्य अभिनेते आहेत, असे मला वाटत होते. मी त्यांचा आदर करत होतो आणि त्यांचे कामही मला आवडत होते. मात्र, ते धोकादायक अर्बन दिमागी नक्षल आहेत, हे मला माहीत नव्हते. त्यांचे खरे स्वरूप समजायला मला खूप उशीर झाला.’ शाह यांची भूमिका भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत हानिकारक असल्याचेही त्यांनी म्हटले.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या पुनर्स्थापनेसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देताना नसीरुद्दीन शाह यांनी फेसबुकवर व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘दिमागी नक्षल’ असा बिल्ला लावून स्वतःला अभिमानाने ‘दिमागी नक्षल’ म्हणवून घेतले. केंद्रातील सरकार देशातील शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा, तरुणांचे मनोबल खच्ची करण्याचा आणि लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शाह यांनी केला. सरकारकडून आपल्यासारख्या लोकांना ‘देशविरोधी’ आणि ‘टुकडे-टुकडे गँग’ अशा विविध संज्ञा दिल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले. देशात खरोखरच ‘टुकडे-टुकडे गँग’ असेल, तर ती सत्तेत असलेली सरकारच आहे, अशी टीकाही शाह यांनी केली.

हे ही वाचा:

शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा विजय; पदवीधरांच्या तीनही जागा मविआकडे

भारताच्या दहशतवादविरोधी रणनीती युद्धसिद्ध!

‘JAI’च्या माध्यमातून हिंद-प्रशांतमध्ये सामरिक समीकरणांना बळ

संजय राऊत, निखिल वागळे हाजिर हो!

जामियातील आंदोलनापूर्वी शाह यांनी कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला होता. विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाची नोंद घेतली जाईल, असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठानंतर सत्यजित रे संस्थेत आणि आता जामियामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा