28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरराजकारणमीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडली भूमिका

Google News Follow

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडीप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपला निर्णय कळवला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून, या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या भूमिकेबाबत पूर्णेकर कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौकशी केली होती. त्यापूर्वी राजेंद्र शिंदे यांचीही अनेक वेळा चौकशी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात मीनाक्षी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर आणि पक्षपातळीवर आपल्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आपल्यावर आरोप करत पक्षनेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून मनाला प्रचंड वेदना होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पक्षाचे निष्ठेने काम केले असून, पक्षाला किंवा नेतृत्वाला मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य केलेले नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले. नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण ठाणे जिल्हा महिला आघाडीप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

मॉस्कोच्या दिशेने युक्रेनचे ड्रोन हल्ले

‘JAI’च्या माध्यमातून हिंद-प्रशांतमध्ये सामरिक समीकरणांना बळ

संजय राऊत, निखिल वागळे हाजिर हो!

कोकण रेल्वेच्या संचालक (वित्त)पदी कविता राकेश साटवी यांची नियुक्ती

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती यांच्यावर पूर्णेकर कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. मीनाक्षी शिंदे यांनी यापूर्वी हे आरोप फेटाळले असून, पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा