27.1 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरविशेषअहिल्यानगर–येवला रेल्वेमार्गावर ‘कवच ४.०’ची सुरक्षा चाचणी यशस्वी

अहिल्यानगर–येवला रेल्वेमार्गावर ‘कवच ४.०’ची सुरक्षा चाचणी यशस्वी

रेल्वे अपघातांचा धोका कमी करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाला बळ

Google News Follow

मध्य रेल्वेने रेल्वे प्रवासाची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पुणे विभागातील १३३.८९ मार्ग किलोमीटर लांबीच्या अहिल्यानगर–येवला रेल्वेमार्गावर स्वदेशी विकसित ‘कवच ४.०’ या प्रगत सुरक्षा प्रणालीचे स्वतंत्र सुरक्षा आकलन २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. यामुळे मध्य रेल्वेवरील एकूण ३३७.४६ मार्ग किलोमीटर क्षेत्रात कवच प्रणालीचे स्वतंत्र सुरक्षा आकलन पूर्ण झाले आहे. कवच ही ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम असून, धोक्याच्या परिस्थितीत सिग्नल ओलांडणे, निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन आणि संभाव्य रेल्वे अपघातांचा धोका कमी करण्यासाठी ती महत्त्वाची भूमिका बजावते.
हे ही वाचा:
डिजिटल फसवणूक झाल्यास बँकांना भरपाई द्यावी लागणार

गेंड्यांच्या शिकारीविरोधात ‘ऑपरेशन फाल्कन’! ४८ जणांना अटक

लंगोटी सुटली तरी नाचतोय अब्दुल!

विरारमध्ये बंद सदनिकेत तीन भावंडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

अहिल्यानगर–येवला मार्गावर १२ रेल्वे स्थानकांवरील टीसीएएस युनिट्स, चार लेव्हल क्रॉसिंग युनिट्स, एक रिमोट इंटरफेस युनिट, २० रेडिओ टॉवर्स आणि १,७७४ आरएफआयडी टॅग बसविण्यात आले आहेत. इटलीतील स्वतंत्र सुरक्षा आकलन पथकाने या प्रणालीची व्यापक तपासणी केली. निर्धारित वेगमर्यादा, कायमस्वरूपी वेग निर्बंध, लेव्हल क्रॉसिंगवरील स्वयंचलित सूचना, वळणांवरील वेग नियंत्रण आणि धोक्याच्या वेळी सिग्नल ओलांडण्यास प्रतिबंध अशा विविध सुरक्षा वैशिष्ट्यांची चाचणी घेण्यात आली. तसेच, रेल्वेगाडी मागे सरकणे, अनियंत्रित हालचाल, एसओएस अलर्ट, रेडिओ संपर्क, आरएफआयडी टॅगची अचूक ओळख आणि स्वयंचलित ब्रेकिंग यंत्रणेचेही परीक्षण करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आमला–छिंदवाडा मार्गावर १०४.१९ किलोमीटर, सोलापूर विभागातील दौंड–कुर्डुवाडी मार्गावर ९९.३८ किलोमीटर आणि पुणे विभागातील अहिल्यानगर–येवला मार्गावर १३३.८९ किलोमीटर अशा एकूण ३३७.४६ मार्ग किलोमीटर क्षेत्रात कवच प्रणालीचे स्वतंत्र सुरक्षा आकलन पूर्ण झाले आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रेल्वे परिचालन अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या संपूर्ण नेटवर्कवर कवच ४.० प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा