28.7 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरबिजनेसभारतीय नौदलाला मिळणार ८ अत्याधुनिक युद्धनौका

भारतीय नौदलाला मिळणार ८ अत्याधुनिक युद्धनौका

४० हजार कोटींच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Google News Follow

भारताच्या सागरी संरक्षण क्षमतेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय नौदलासाठी आठ अत्याधुनिक नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट (Next Generation Corvettes) युद्धनौकांची निर्मिती करण्याच्या सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत कोलकातास्थित गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड या दोन सरकारी कंपन्यांकडून युद्धनौकांची बांधणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.

या युद्धनौकांची रचना भारतीय नौदलाच्या आवश्यकतांनुसार स्वदेशी पातळीवर विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक युद्धनौकेचे वजन सुमारे २ हजार टन असणार असून, त्यांचा कमाल वेग ताशी ५५ किलोमीटर म्हणजेच ३० नॉट्सपर्यंत असेल. अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने शत्रूच्या रडारवर या युद्धनौका सहजपणे शोधणे कठीण होणार आहे. हवाई, पृष्ठभागावरील तसेच पाण्याखालील धोक्यांचा सामना करण्यासाठी या युद्धनौका सक्षम असतील.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या अराजकतेच्या राजकारणाविरोधात भाजपचा देशभरात एल्गार

१२ वर्षांत ४९.६ कोटी लोक दारिद्र्य रेषेखालून बाहेर

प्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले

भूतानमध्ये हिमनदी तलाव फुटला

या प्रकल्पातील आठ युद्धनौकांपैकी पाच युद्धनौकांची निर्मिती GRSE कंपनी करणार असून, उर्वरित तीन युद्धनौका गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून बांधल्या जाणार आहेत. सागरी टेहळणी, व्यापारी जहाजांना संरक्षण, किनारपट्टीची सुरक्षा आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासह विविध लष्करी मोहिमांसाठी त्यांचा वापर केला जाणार आहे. भारतीय नौदलाला पहिली युद्धनौका २०३० पर्यंत सुपूर्द करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी उद्योगाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना नव्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच रोजगारनिर्मितीलाही हातभार लागणार आहे. परदेशी युद्धनौकांवरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्याच्या धोरणातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हिंद महासागर क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या युद्धनौका भारतीय नौदलाची कार्यक्षमता आणि सागरी उपस्थिती अधिक मजबूत करण्यास मदत करतील.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा