28.6 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारणमुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पत्रकार निधी रझदान यांच्याशी थाटणार संसार!

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पत्रकार निधी रझदान यांच्याशी थाटणार संसार!

घटस्फोटानंतर तीन महिन्यांत नवी सुरुवात

Google News Follow

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. प्रसिद्ध पत्रकार आणि वृत्तनिवेदिका निधी रझदान यांच्याशी विवाह केल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. शनिवारी त्यांनी दोघांचे एकत्रित छायाचित्र शेअर करत ही आनंदाची बातमी सार्वजनिक केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळासह पत्रकारिता क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ३० ऑक्टोबर रोजी हा विवाहसोहळा पार पडला असून, अत्यंत खासगी स्वरूपात दोन्ही कुटुंबांतील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली.

ओमर अब्दुल्ला यांच्या दुसऱ्या विवाहाची चर्चा त्यांच्या आधीच्या वैवाहिक आयुष्यामुळेही होत आहे. १९९४ मध्ये त्यांचा पायल अब्दुल्ला यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, २००९ पासून दोघेही विभक्त राहत होते. या दाम्पत्याला झहीर आणि झमीर अशी दोन मुले आहेत. दीर्घकाळ चाललेल्या वैवाहिक वादानंतर ३१ जुलै २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या परस्पर संमतीने घटस्फोटाला मंजुरी दिली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत ओमर अब्दुल्ला यांनी निधी रझदान यांच्यासोबत विवाह करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
भारताच्या नाविकला बळ देणारा एनव्हीएस-०३

लाडावलेल्या राजपुत्राला खुश करण्यासाठी प्रतिकात्मक संसद

सिंहस्थ धर्मध्वजात अमृत कुंभापासून दशदिशांपर्यंतच्या परंपरेचे दर्शन

बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का

निधी रझदान या भारतीय पत्रकारितेतील परिचित चेहरा आहेत. एनडीटीव्हीमध्ये त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले असून, राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडींवरील त्यांच्या विश्लेषणात्मक पत्रकारितेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. ‘लेफ्ट, राइट अँड सेंटर’ या चर्चात्मक कार्यक्रमातून त्या घराघरांत पोहोचल्या. पत्रकारिता, लेखन आणि वृत्तनिवेदन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पत्रकार निधी रझदान यांच्या विवाहामुळे देशाच्या राजकीय आणि माध्यमविश्वात या नव्या नात्याची चर्चा रंगली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा