28.6 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरक्राईमनामालोकलमधील तरुणींचे गुपचूप व्हिडिओ काढून AI द्वारे मॉर्फिंग करणाऱ्या अटक

लोकलमधील तरुणींचे गुपचूप व्हिडिओ काढून AI द्वारे मॉर्फिंग करणाऱ्या अटक

मुंबई पोलीसांची कारवाई

Google News Follow

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणींचे त्यांच्या नकळत व्हिडिओ चित्रीकरण करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे अश्लील आणि विवस्त्र फोटो तयार करणाऱ्या ३१ वर्षीय आरोपीला दक्षिण सायबर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद साबीर मोहम्मद रुस्तम (वय ३१, रा. वसई पूर्व, मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावर अधिकाधिक व्ह्यूज मिळवण्याच्या उद्देशाने तो महिलांचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आपल्या मैत्रिणीसह चर्चगेट ते विरार फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने दोघींच्या नकळत त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर २७ जून रोजी ‘pile6531’ या बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून अश्लील गाण्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्हिडिओची रील पोस्ट करण्यात आली. या रीलला तब्बल एक लाख ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या प्रकारामुळे तरुणीची बदनामी झाल्याने तिने १९ ऑक्टोबर रोजी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध

या प्रकरणात आरोपीचा चेहरा, नाव किंवा अन्य कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. आरोपीने ‘Playboy’ या नावाने आणि एका मुलीचा प्रोफाइल फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले होते. त्यामुळे तपासासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, दक्षिण सायबर पोलिसांच्या पथकाने बहुस्तरीय तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी मोहम्मद साबीर याला अटक केली.

व्यवसायाने टेलर असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. या मोबाईलची तपासणी केली असता, त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांचे त्यांच्या नकळत चित्रीत केलेले अनेक फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. AI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या छायाचित्रांचे मॉर्फिंग करून अश्लील स्वरूपात इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ सोशल मीडियावर अधिक व्ह्यूज मिळवण्यासाठी आरोपी हा प्रकार करत असल्याचेही समोर आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक फातिमा बागवान, सहायक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे, पोलीस शिपाई नितीन शिंदे आणि महिला पोलीस शिपाई रेश्मा धुमाळ यांच्या पथकाने केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा