29.6 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारणहा विरोधी पक्ष नव्हे, तर अडथळा पक्ष!

हा विरोधी पक्ष नव्हे, तर अडथळा पक्ष!

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी केलेल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना विरोधकांच्या अवस्थेवर भाष्य केले. ते म्हणाले, विरोधक आता ‘विरोधी पक्ष’ न राहता ‘अडथळा पक्ष’ बनले आहेत. देशाने अशा परिस्थितीत एकत्र राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

गुजरातमधील एकतानगर येथील परेड ग्राउंडवर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी म्हणाले, “हे आपले दुर्दैव आहे की विरोधक आता विरोधी पक्ष न राहता अडथळा पक्ष बनले आहेत.”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “परदेशात गुपचूप कोण कोणाला भेटत आहे? भारतविरोधी शक्ती कोणाला पाठिंबा देत आहेत? भारताच्या शत्रूंची भाषा कोण बोलत आहे?” अशा शक्तींविरोधात देशाने एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. विरोधक देशातील जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा:

कॉक्रोच जनता पार्टीचा इंडी आघाडीच्या रॅलीत सहभाग नाही

ऍड. संजीव पुनाळेकर यांना मातृशोक

लोकलमधील तरुणींचे गुपचूप व्हिडिओ काढून AI द्वारे मॉर्फिंग करणाऱ्या अटक

लाडावलेल्या राजपुत्राला खुश करण्यासाठी प्रतिकात्मक संसद

‘वैचारिक नक्षलवाद्यांचा’ धोका कायम

सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर केला जात असून, अफवा पसरवल्या जात आहेत आणि भारताची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले, “गेल्या वर्षी मी सांगितले होते की देश नक्षलवाद आणि माओवादापासून मुक्त होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. आपण दिलेले ते आश्वासन पूर्ण केले आहे. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त केला असला, तरी ‘वैचारिक नक्षलवाद्यांचा’ धोका अद्याप खूप मोठा आहे.”

देशाच्या पुढील महत्त्वाच्या उद्दिष्टांबाबत बोलताना मोदी यांनी भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित करणे, घुसखोरी रोखणे, लोकसंख्येतील बदलांना आळा घालणे आणि समान नागरी संहितेऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेने वाटचाल करणे, अशी उद्दिष्टे मांडली.

“एक भारत, श्रेष्ठ भारत आणि विकसित भारत ही आपली दोन उद्दिष्टे आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवलेल्या मार्गावरून देश पुढे जात आहे,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतानगर येथे पर्यटन आणि नागरी पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी एकूण ४२६.७१ कोटी रुपयांच्या ३१ विकासकामांचा शुभारंभ केला. यामध्ये ३०७.८३ कोटी रुपये खर्चाच्या २३ विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले, तर ११८.८८ कोटी रुपये खर्चाच्या आठ विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा