29.1 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरदेश दुनियाबांग्लादेशात वेतनवाढीसाठी वस्त्रोद्योग कामगारांचा हिंसक आंदोलनाचा उद्रेक

बांग्लादेशात वेतनवाढीसाठी वस्त्रोद्योग कामगारांचा हिंसक आंदोलनाचा उद्रेक

ढाका आणि गाझीपूरमध्ये तणाव

Google News Follow

बांग्लादेशातील वस्त्रोद्योग क्षेत्र पुन्हा एकदा कामगारांच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी हजारो वस्त्रोद्योग कामगार रस्त्यावर उतरले असून, ढाका आणि गाझीपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली आहे. वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे चढे दर आणि अपुऱ्या वेतनामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांनी वेतनात वाढ करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, कामगारांची प्रमुख मागणी म्हणजे सध्याचे किमान मासिक वेतन १२ हजार ५०० टका (बांग्लादेशी चलन) वरून ३० हजार टका करावे, अशी आहे. म्हणजेच कामगारांना सध्याच्या वेतनाच्या दुपटीहून अधिक वाढ हवी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावानंतर खासगी क्षेत्रातील कामगारांनीही वेतनवाढीची मागणी अधिक तीव्र केली आहे. वाढत्या अन्नधान्याच्या किमती, घरभाडे, वाहतूक आणि आरोग्यावरील खर्चामुळे सध्याच्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
२०२४ची लोकसभा निवडणूकच बेकायदेशीर होती!

पोल पोझिशन मिळविल्याबद्दल हॅमिल्टन खुश

एका वर्षात भारतीय फलंदाजांनी मारले ४०० विक्रमी षटकार

कर्नाटकातला धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याची ख्रिस्ती धर्मगुरूंची मागणी

आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे आणि साउंड ग्रेनेडचा वापर केला. काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ आणि कारखान्यांची तोडफोड केली. गाझीपूरमध्ये अनेक कारखान्यांना सुट्टी जाहीर करावी लागली, तर महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश बॉर्डर गार्डचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बांगलादेश सरकारने सहा सदस्यीय वेतन मंडळ स्थापन केले आहे. कामगार आणि उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून नव्या वेतनाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, वेतनवाढीची अधिकृत घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योगाचा मोठा वाटा असून, या क्षेत्रात सुमारे ४० लाख कामगार कार्यरत आहेत. देशाच्या एकूण निर्यात उत्पन्नातील ८० टक्क्यांहून अधिक वाटा या उद्योगातून येतो. त्यामुळे आंदोलन लांबल्यास कपड्यांच्या निर्यातीवर, परदेशी ऑर्डरवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा