29.1 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरक्राईमनामानोकरीला लागल्यावर १६ दिवसात घरकामगाराने लांबवले ३० लाखांचे सोने

नोकरीला लागल्यावर १६ दिवसात घरकामगाराने लांबवले ३० लाखांचे सोने

जुहूतील व्यावसायिकाला बसला फटका

Google News Follow

दिवाळीच्या खरेदीसाठी सराफाकडून घरी मागवलेले तब्बल ३० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व नाणी लांबवणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला डी. एन. नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काम सुरू केल्यानंतर अवघ्या १६ दिवसांत तिने हा डल्ला मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. श्रेया वाळझाडे (वय २२) असे या आरोपी महिलेचे नाव असून, तिला अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील तिच्या मूळ गावाहून ताब्यात घेण्यात आले आहे.

जुहू येथील रहिवासी व व्यावसायिक दीपक सिंग यांनी या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली होती. सिंग यांच्या बहिणीने दिवाळीच्या सणानिमित्त काळबादेवी येथील ‘मयूर ज्वेलर्स’चे मालक मनीष संचेती यांच्याकडून दागिन्यांचे काही सॅम्पल घरी मागवले होते. २३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गंगा नावाचा कर्मचारी हे दागिने घेऊन घरी आला. यात २४ कॅरेटची ६८ ग्रॅम वजनाची ५ सोन्याची नाणी आणि १८ कॅरेटच्या १६५.७० ग्रॅम वजनाच्या १५ सोन्याच्या साखळ्या, असे एकूण २३३.७० ग्रॅम सोने होते. सिंग यांच्या बहिणीने हे दागिने कपाटात ठेवण्यासाठी घरातील कामगार श्रेया हिच्याकडे दिले होते.

हे ही वाचा:

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘रिजिम चेंज’ होऊ देणार नाही!

२०२९ ला मोदींसाठी राहुल गांधी यांचे रेड कार्पेट…

टेक्सासच्या एका सिनेट जागेसाठी ५७.३ कोटी डॉलरचा विक्रमी खर्च

भारतानंतर आता परदेशातही धावणार ‘वंदे भारत’

दुसऱ्या दिवशी, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास श्रेया घरातून निघून गेली. सायंकाळी ५ नंतर तिचा फोन अचानक बंद येऊ लागल्याने संशय बळावला. सिंग व त्यांच्या बहिणीने बेडरूममधील कपाटाची तपासणी केली असता, दागिन्यांचे पाकीट रिकामे असल्याचे आढळले.

एजन्सीच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या
श्रेया ही ७ ऑक्टोबर रोजीच एका मॅनपावर एजन्सीमार्फत सिंग यांच्या घरी कामाला लागली होती. तिला दरमहा ४५ हजार रुपये वेतन दिले जात होते. मात्र, अवघ्या १६ दिवसांत तिने संधी साधत तब्बल ३० लाखांचे सोने लंपास केले. पोलिसांनी संबंधित एजन्सीकडून तिची माहिती मिळवून तातडीने तपासचक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे अहिल्यानगरमधील निमोणे गावातून श्रेयाला अटक करण्यात आली.

चोरीला गेलेले दागिने हस्तगत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आरोपी तरुणीने यापूर्वी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास डी. एन. नगर पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा