30 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरविशेषतुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

तुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

पाच कोटींची खंडणी मागितल्याचा दावा

Google News Follow

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून चित्रपट कलाकार आणि व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणानंतर आता अभिनेता तुषार कपूर यांनाही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गँगचा कथित सदस्य हॅरी बॉक्सर याच्या नावाने तुषार कपूर यांना फोन करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुंबई गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात हा फोन बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तुषार कपूर यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत मुंबई पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखेने संबंधित फोनमधील आवाजाची तपासणी करून तो हॅरी बॉक्सरच्या उपलब्ध ऑडिओ नमुन्यांशी जुळतो का, याची पडताळणी केली. मात्र, प्राथमिक तपासात दोन्ही आवाजांमध्ये साम्य नसल्याचे आढळून आले.
हे ही वाचा:
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्ताचे निलंबन

माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची धडक

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; एक खलाशी ठार

छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, फोनवरील आवाज उपलब्ध ऑडिओ नमुन्यांशी जुळत नसल्याने हा कॉल बनावट असण्याची शक्यता आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव आणि तिच्या दहशतीचा वापर करून कोणीतरी अभिनेत्याला धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, या धमकीच्या फोनमागे नेमकी कोणती व्यक्ती आहे, तसेच कॉल कुठून करण्यात आला, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा