28.7 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरदेश दुनियाओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; एक खलाशी ठार

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; एक खलाशी ठार

१३ जणांची सुखरूप सुटका

Google News Follow

पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षाची झळ व्यापारी जहाजांना बसत आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर अज्ञात हवाई वस्तूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, जहाजावरील अन्य १३ खलाशांची ओमानच्या तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. घटनेची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली.

‘एमएसव्ही अल जुसीफी’ असे या जहाजाचे नाव असून, त्यावर १४ भारतीय खलाशी होते. ओमानच्या किनारपट्टीजवळून प्रवास करत असताना जहाजाला अज्ञात हवाई वस्तूने धडक दिली. या घटनेत जखमी झालेल्या एका खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत खलाशाची ओळख गुजरातचे रहिवासी गंधार नाहिम अजीज अशी पटली आहे. उर्वरित १३ खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर भारतीय दूतावास ओमानमधील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. जहाजावरील बचावलेल्या खलाशांना आवश्यक मदत पुरवण्यासह त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत खलाशाचे पार्थिवही भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त

दिवाळीपूर्वीच दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात

अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘रिजिम चेंज’ होऊ देणार नाही!

दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील सागरी मार्गांवरील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वीही या परिसरात भारतीय खलाशांना लक्ष्य करणाऱ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील व्यापारी जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचे आव्हान वाढले आहे. मात्र, या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा