30 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरक्राईमनामाबांगलादेश सीमेवर तस्करांनी जवानांवर केला लाठ्यांनी हल्ला

बांगलादेश सीमेवर तस्करांनी जवानांवर केला लाठ्यांनी हल्ला

कंपनी कमांडरसह चार जवान जखमी

Google News Follow

त्रिपुरातील बांगलादेश सीमेजवळ तस्करांच्या एका टोळक्याने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कंपनी कमांडर रोहित यांच्यासह चार जवान जखमी झाले आहेत. तस्करांनी जवानांना लाठ्यांनी बेदम मारहाण करत त्यांची शस्त्रे हिसकावण्याचाही प्रयत्न केला. तसेच, जवानांच्या सरकारी वाहनाची तोडफोड केली. या घटनेमुळे सीमावर्ती आशाबाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, त्रिपुरातील सिपाहीजाला जिल्ह्यातील बॉक्सानगर येथील आशाबाडी सीमा चौकीजवळ सकाळी सुमारे ९ वाजता ही घटना घडली. सीमेजवळील कुंपणाच्या गेट क्रमांक १७४ आणि १७५ परिसरातून काही तस्कर बेकायदा वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ४९व्या बटालियनच्या जवानांनी त्यांचा पाठलाग केला. या कारवाईत हेफजूर रहमान नावाच्या संशयित तस्कराला पकडण्यात आले.

दरम्यान, रहीमपूर कांतमुरा सीमा चौकीचे तीन जवान सरकारी वाहनातून बॉक्सानगरच्या दिशेने जात असताना तस्करांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी लाठ्यांनी जवानांना मारहाण केली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी जवानांना उपचारासाठी बॉक्सानगर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

मंदिरांत पुजारी बलात्कार करतात…नेहा बोराने विष ओकले

माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची धडक

मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

तुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

मुख्यमंत्र्यांकडून हल्ल्याचा निषेध

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर अतिरिक्त बीएसएफ जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि बीएसएफ अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा