30 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरक्राईमनामानाहूरमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधेचा संशय

नाहूरमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधेचा संशय

केटरर्सविरोधात गुन्हा दाखल

Google News Follow

नाहूर पश्चिम येथील बुद्ध विहार सभागृहात आयोजित लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या जेवणाचे सेवन केल्यानंतर चार मुलांसह अनेकांना शारीरिक त्रास झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी जेवणाची व्यवस्था करणाऱ्या ‘कलश केटरर्स’च्या मालकासह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार सभागृहात १ नोव्हेंबर २०२६ रोजी लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभातील जेवणाची व्यवस्था मुलसिंग हरिसिंग राजपुरोहित यांच्या मालकीच्या कलश केटरर्सकडे सोपवण्यात आली होती. समारंभात जेवण केल्यानंतर चार मुलांसह अनेक जणांना शारीरिक त्रास जाणवू लागला. त्यामुळे जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

हे ही वाचा:

मंदिरांत पुजारी बलात्कार करतात…नेहा बोराने विष ओकले

तुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

रेवंत रेड्डी, तुम्ही तेलंगणाला काँग्रेस नेत्यांचे एटीएम बनवले!

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘रिजिम चेंज’ होऊ देणार नाही!

या घटनेची दखल घेत भांडुप पोलिसांनी कलश केटरर्सचे मालक मुलसिंग हरिसिंग राजपुरोहित आणि अन्य संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २७४, २७५, १२५, १२५ (अ), २८६ आणि ३ (५), तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भांडुप पोलीस करीत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा