30.3 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरबिजनेसहार्ले डेव्हिडसनची नवी ४४० सीसी क्रूझर बाईक

हार्ले डेव्हिडसनची नवी ४४० सीसी क्रूझर बाईक

रॉयल एनफिल्डला देणार टक्कर!

Google News Follow

अमेरिकेची प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी हार्ले डेव्हिडसनने आपली नवीन क्रूझर बाईक ‘स्प्रिंट ४४०’ सादर केली आहे. ही बाईक हिरो मोटोकॉर्पच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. आकर्षक रेट्रो लूक, दमदार इंजिन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असलेल्या या बाईकची रॉयल एनफिल्ड मीटिअर ३५० आणि होंडा रिबेल ३०० या बाईक्सशी स्पर्धा होणार आहे. इटलीतील मिलान येथे ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ईआयसीएमए २०२६ मोटरसायकल प्रदर्शनात ही बाईक सार्वजनिकरीत्या सादर केली जाणार आहे. अमेरिकेत २०२७ मध्ये तिचे लॉन्चिंग नियोजित आहे.

स्प्रिंट ४४० मध्ये ४४० सीसीचे सिंगल सिलिंडर, एअर आणि ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६ हजार आरपीएमवर २६.७ बीएचपी पॉवर आणि ४ हजार आरपीएमवर ३८ एनएम टॉर्क निर्माण करते. यासोबत सहा स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट अँड स्लिपर क्लच देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक सुमारे ३४ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकते. विशेष म्हणजे, या बाईकची सीट उंची अवघी ६७१ मिलिमीटर असल्याने कमी उंचीच्या रायडर्सनाही ती सहज हाताळता येणार आहे. पुढील बाजूला १९ इंच आणि मागील बाजूला १७ इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
व्हॉट्सॲपवर दिवाळी बोनसच्या नावाने सायबर जाळे

उत्तराखंडमध्ये पाच ट्रेकर्ससह आठ जण बेपत्ता

रशियाचा युक्रेनच्या शाळेवर दुहेरी हवाई हल्ला; २४ ठार

ओमानजवळ जहाजावरील हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; भारताचा निषेध

फीचर्सच्या बाबतीतही स्प्रिंट ४४० लक्षवेधी ठरते. यात ३.५ इंच कलर टीएफटी डिस्प्ले, एलईडी लाइटिंग, यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि एबीएससह डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये या बाईकची सुरुवातीची किंमत ४,९९५ पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ६.३४ लाख रुपये आहे. मात्र, भारतातील लॉन्चिंग आणि किंमतीबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. भारतीय बाजारात ही बाईक दाखल झाल्यास प्रीमियम क्रूझर सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डसमोर नवे आव्हान उभे राहू शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा