29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरबिजनेसअमेरिकेच्या शेअर बाजारात एआय कंपन्यांचे २.३ ट्रिलियन डॉलरचे नुकसान

अमेरिकेच्या शेअर बाजारात एआय कंपन्यांचे २.३ ट्रिलियन डॉलरचे नुकसान

ट्रम्प यांचा डेमोक्रॅट्सवर आरोप

Google News Follow

अमेरिकेच्या शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाल्याने जागतिक आर्थिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या निकालांचे पडसाद आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी विक्री यामुळे बाजार कोसळला. विशेषतः एनव्हिडिया, एएमडी आणि मायक्रॉन यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या पडझडीत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या बाजारमूल्यात सुमारे २.३ ट्रिलियन डॉलरची घट झाली आहे. एआय क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढत्या मूल्यांकनाबाबत आधीपासूनच चिंता व्यक्त केली जात होती. त्यात निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि धोरणात्मक अनिश्चिततेची भर पडल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केली.

या घसरणीचा सर्वाधिक फटका तंत्रज्ञान क्षेत्राला बसला. अमेरिकेचा नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक तब्बल ५.५२ टक्क्यांनी घसरून २४,३१५ अंकांवर बंद झाला. एस अँड पी ५०० निर्देशांकात ४.३६ टक्क्यांची, तर डाऊ जोन्समध्ये ३.४४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. सेमीकंडक्टर क्षेत्रातील कंपन्यांचा फिलाडेल्फिया सेमीकंडक्टर इंडेक्स तब्बल १२ टक्क्यांनी कोसळला. एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनव्हिडियाच्या शेअर्समध्येही ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. एआय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या भविष्यातील नफ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील तेजीला मोठा धक्का बसला असून, गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
की-चेनवरील ‘जय श्रीराम’ची अक्षरे पुसून मुंब्र्यात विक्री

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज; ४०० कुटुंबांची दिवाळी उजळणार

महाभारत, अर्थशास्त्र, राजतरंगिणीची युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये नोंद

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा

दरम्यान, या घसरणीमागे एआय क्षेत्राशी संबंधित धोरणात्मक चिंताही महत्त्वाची ठरत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या निवडणुकीतील यशामुळे एआय कंपन्यांवर अधिक कठोर नियम लागू होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. विशेषतः एआय तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या डेटा सेंटर्सच्या उभारणीवर निर्बंध येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या बाजारातील घसरणीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाला जबाबदार धरले आहे. आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजाराला मोठा धक्का बसल्याची टीका केली. बाजाराला ऐतिहासिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते; मात्र डेमोक्रॅट्सच्या विजयामुळे बाजारातील तेजीला ब्रेक लागल्याचा दावा त्यांनी केला. या घसरणीचा परिणाम अमेरिकन नागरिकांच्या निवृत्तीनंतरच्या बचतीवरही होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा