28.7 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरदेश दुनियाव्हाईट हाऊसबाहेरून तीन बंदुकांसह व्हेनेझुएलाचा तरुण अटकेत

व्हाईट हाऊसबाहेरून तीन बंदुकांसह व्हेनेझुएलाचा तरुण अटकेत

ट्रम्प यांच्या हत्येचा कट उधळला

Google News Follow

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कथित कटाचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. व्हाईट हाऊसजवळ संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या एका वाहनातून तीन बंदुका आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी व्हेनेझुएलाचा ३० वर्षीय नागरिक रॉनी योरड्रिक्स ग्वानिपा क्रिनोस याला अटक करण्यात आली. ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आल्याचे आणि त्यासाठी डोक्यात आवाज ऐकू येत असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावा अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने केला आहे.

गुरुवारी (५ नोव्हेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. व्हाईट हाऊस परिसरातील कॉन्स्टिट्यूशन अव्हेन्यूवर निळ्या रंगाची फोर्ड एफ-१५० पिकअप संशयास्पदरीत्या उभी असल्याचे सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर अधिकाऱ्याने वाहनाजवळ जाऊन चालकाची चौकशी केली. यावेळी त्याच्याकडे शस्त्रे असल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात एआर-१५ रायफल, मॅक-१० पिस्तूल, ग्लॉक ४३ एक्स पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे आढळली.

हे ही वाचा:

‘रामायण’चा पहिल्या दिवशी ६५ कोटींचा धमाका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शरद पवारांची रुग्णालयात भेट

‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

ब्रेंट क्रूड पुन्हा १०० डॉलरच्या उंबरठ्यावर

विशेष म्हणजे, संबंधित वाहन चोरीला गेल्याची तक्रार यापूर्वीच दाखल करण्यात आली होती. संशयिताने अधिकाऱ्यांशी संवाद साधताना आपल्याला ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी वॉशिंग्टनला जाण्याचे आवाज डोक्यातून (मेंदूतून) ऐकू येत असल्याचे सांगितल्याचा दावा गृह सुरक्षा विभागाने केला आहे. या प्रकरणी आरोपीवर शस्त्र बाळगणे, विनापरवाना पिस्तूल आणि रायफल बाळगणे, चोरीच्या वाहनाचा वापर करणे तसेच चोरीच्या मालमत्तेशी संबंधित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या त्याला जामीन नाकारण्यात आला असून तो पोलिसांच्या कोठडीत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा