29.9 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारणराष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख अजितदादांनीच सांगितली होती

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख अजितदादांनीच सांगितली होती

सुनील तटकरेंचा मोठा खुलासा

Google News Follow

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाचा खुलासा करताना, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची तारीख निश्चित केली होती, असा दावा केला आहे. अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले असते, असे तटकरे यांनी सांगितले. अजित पवार यांनी स्वतः आपल्याला ही तारीख सांगितली होती. तसेच विलीनीकरणाच्या प्रक्रियेबाबतही माहिती दिली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकत्रीकरणाची चर्चा केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती, हे तटकरे यांच्या विधानातून समोर आले आहे.

मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया थांबली. त्यांच्या निधनामुळे राजकीय परिस्थिती बदलली असून, सध्या विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी शरद पवार गटाकडून दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र, तटकरे यांनी त्यावेळी हे दावे फेटाळले होते. आता त्यांनीच विलीनीकरणासाठी १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेटही महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा चर्चेची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत विलीनीकरणाचा विषय पुढे जाण्याची चिन्हे नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांनी आखलेली विलीनीकरणाची योजना त्यांच्या निधनानंतर अपूर्ण राहिल्याचे चित्र आहे. आता दोन्ही गटांतील नेत्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा