28.4 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरविशेषदिवाळीच्या रात्री आतषबाजी, दुसऱ्या दिवशी मुंबईत प्रदूषणाची कोंडी

दिवाळीच्या रात्री आतषबाजी, दुसऱ्या दिवशी मुंबईत प्रदूषणाची कोंडी

आठ भागांत एक्यूआय २०० पार

Google News Follow

दिवाळीच्या रात्री फोडण्यात आलेल्या फटाक्यांचा परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. दिवाळीनंतर सोमवारी सकाळी शहरातील आठ ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय २०० च्या पुढे गेला. वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसरात सर्वाधिक २६५ एक्यूआयची नोंद झाली. तर मुंबईचा सरासरी एक्यूआय सकाळी ९ वाजता १७१ वर पोहोचला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दिवाळीनंतर नोंदवलेल्या १३४ एक्यूआयच्या तुलनेत यंदा प्रदूषणात २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे, दिवाळीच्या दिवशी रविवारी दुपारी मुंबईचा एक्यूआय १३१ होता. गेल्या चार वर्षांतील दिवाळीच्या दुपारच्या वेळेतील ही सर्वात कमी नोंद होती. समुद्राकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण कमी राहिले होते. मात्र, रात्री फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर परिस्थिती बदलली.

आठ भागांत हवा खराब श्रेणीत

सोमवारी सकाळी वांद्रे पूर्वेतील खेरवाडी येथे २६५ एक्यूआय नोंदवण्यात आला. त्याखालोखाल वांद्रे-कुर्ला संकुलात २३२, सेवरीत २२९, देवनारमध्ये २२८, घाटकोपरमध्ये २२१, नेव्ही नगर आणि शिवाजीनगरमध्ये प्रत्येकी २२०, तर चेंबूरमध्ये २१५ एक्यूआयची नोंद झाली. याशिवाय वरळीतील सिद्धार्थ नगरमध्ये १९४, भायखळ्यात १८८, मालाड पश्चिमेत १८३ आणि कांदिवलीत १८१ एक्यूआय नोंदवण्यात आला.

हे ही वाचा:

फटाक्यांचा रेल्वे सिग्नल यंत्रणेला फटका; पश्चिम रेल्वे उशिराने

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग चिनी गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर?

कुख्यात गँगस्टर गुरविंदर इथिओपियातून भारतात प्रत्यार्पित

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणानुसार, या भागांतील प्रदूषणामागे PM2.5 हे सूक्ष्म प्रदूषक कण प्रमुख कारण आहेत. फटाक्यांच्या धुरातून बाहेर पडणारे हे कण श्वासावाटे फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे श्वसनाचे विकार आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. दरम्यान, मुंबई महापालिकेने शहरातील सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये रात्रभर धुक्याची फवारणी करणारी वाहने तैनात केली होती. पाण्याची फवारणी करून हवेतील प्रदूषकांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा