28.4 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरविशेषदिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई

चार दिवसांत ५०० कोटींच्या उंबरठ्यावर

Google News Follow

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण : पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या चार दिवसांत चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा विक्रमही या चित्रपटाने आपल्या नावावर केला आहे.

८ नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी चित्रपटाने भारतात ५६.१५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. यापूर्वी हा विक्रम सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाच्या नावावर होता. २०२३ मध्ये दिवाळीच्या दिवशी ‘टायगर ३’ने ४४.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ने ४३.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘रामायण’ने या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे.

आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत भारतात २३८.८५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन २८५.२० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. परदेशातील २१४ कोटी रुपयांच्या कमाईसह चित्रपटाचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ४९९.२० कोटी रुपये झाले आहे.

हे ही वाचा:

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग चिनी गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर?

कुख्यात गँगस्टर गुरविंदर इथिओपियातून भारतात प्रत्यार्पित

इस्रायलमध्ये गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण

रामायण: पार्ट वन’ची तिसऱ्या दिवशी ६९.८० कोटींची कमाई

हिंदी भाषेतून सर्वाधिक कमाई

चौथ्या दिवशी चित्रपटाच्या एकूण कमाईत हिंदी भाषेचा सर्वाधिक वाटा राहिला. हिंदी आवृत्तीतून ३६.७५ कोटी रुपये मिळाले. याशिवाय कन्नडमधून ७.२५ कोटी, तेलुगूमधून ६.२५ कोटी, तमिळमधून ३.१५ कोटी आणि मल्याळममधून २.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. दिवाळीच्या दिवशी देशभरातील २१ हजार ७७० शोमधून सुमारे २३.५३ लाख तिकिटांची विक्री झाली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा