31.8 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानी टीव्ही अँकरची पतीकडून गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानी टीव्ही अँकरची पतीकडून गोळ्या झाडून हत्या

रावळपिंडीतील राहत्या घरात आढळला मृतदेह

Google News Follow

पाकिस्तानी टीव्ही अँकर आणि कार्यक्रम निवेदिका राबिया अहसान यांची रावळपिंडीतील राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचे पती अहसान ताहिर खान यांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत पतीने गोळी झाडल्याची कबुली दिली असली, तरी बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याचा दावा केला आहे.

रविवारी रावळपिंडीतील गुलशनाबाद परिसरातील घरात राबिया अहसान यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मानेखाली गोळी लागल्याची जखम होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित पिस्तूल जप्त केले असून, पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीचे पथक पुरावे गोळा करत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अहसान ताहिर खान याने पिस्तूल हाताळत असताना चुकून गोळी सुटल्याचे सांगितले. पिस्तूल भरलेले असल्याची आपल्याला कल्पना नव्हती, असाही त्याचा दावा आहे. मात्र, या दाव्याची सत्यता फॉरेन्सिक तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी पिस्तुलाचा परवाना आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याचाही तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा:

बालशोषणाचे २० हजार फोटो-व्हिडिओ बाळगल्याप्रकरणी सैफुद्दीन मलिकला अटक

गुरुग्राममधून वैध पासपोर्ट नसलेल्या १४ बांगलादेशींना अटक

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई

चीनमध्ये १० कोटी नागरिक कर्जफेडीच्या संकटात

राबिया अहसान ४१ वर्षांच्या होत्या. त्या पाकिस्तानमधील खासगी ९२ न्यूज या वृत्तवाहिनीत अँकर आणि कार्यक्रम निवेदिका म्हणून कार्यरत होत्या. ज्येष्ठ पत्रकार आमिर मतीन आणि रौफ क्लासरा यांच्यासोबत त्यांनी चालू घडामोडींवरील कार्यक्रमाचे सहनिवेदनही केले होते. त्यांना १३ आणि ११ वर्षांच्या दोन मुली आहेत. गोळीबार झाला, त्यावेळी त्यांच्या मुली घराच्या परिसरातील लॉनमध्ये आजीसोबत असल्याचे वृत्त आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा