34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण२०४७ च्या डेडलाईननुसार विकसित भारतासाठी सरकारचे काम सुरू!

२०४७ च्या डेडलाईननुसार विकसित भारतासाठी सरकारचे काम सुरू!

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

पत्रकारितेत डेडलाइनमुळे कामाच्या प्राथमिकता ठरतात आणि कामाचा वेग वाढतो. हाच नियम देशाच्या विकासालाही लागू होतो. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी २०४७ पर्यंत वाट पाहून चालणार नाही. त्यासाठी छोटे-मोठे टप्पे निश्चित करून आतापासूनच काम करावे लागेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची उदाहरणे देताना पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या मोबाईल उत्पादन क्षेत्रातील वाढ, चिनाब नदीवरील जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल, स्टार्टअप इकोसिस्टम आणि यूपीआय प्रणालीचा उल्लेख केला. भारत जगातील प्रमुख मोबाईल फोन उत्पादक देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. तसेच जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक आणि सर्वात मोठी यूपीआय प्रणाली उभारण्यात भारताने स्थान मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून साध्य केलेल्या उद्दिष्टांचाही त्यांनी उल्लेख केला. चार कोटी कुटुंबांना पक्की घरे, तीन कोटी लखपती दीदी आणि १२ कोटी घरांमध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यासारखी उद्दिष्टे पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशातील रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरणही पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. या उदाहरणांमधून विकासाची उद्दिष्टे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही भाष्य केले. केवळ राजकीय घडामोडींवरच नव्हे, तर समाजासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवरही माध्यमांमध्ये चर्चा व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले. तरुणांना व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता, डीपफेक, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा यांसारख्या विषयांनाही माध्यमांच्या चर्चांमध्ये स्थान मिळायला हवे, असे मोदी म्हणाले. या विषयांवर सातत्याने चर्चा झाल्यास समाजात जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

कुराणातील आयत कोरलेल्या करीना कपूर खानच्या पेंडंटवर काँग्रेसचा संताप

छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला लोकलमधून ढकलले

देशासमोर २०४७ ची निश्चित कालमर्यादा आहे. मात्र, विकसित भारताचे लक्ष्य हे केवळ भविष्यातील स्वप्न राहू नये, यासाठी प्रत्येक क्षेत्राने आपापल्या पातळीवर ठोस योगदान देणे आवश्यक आहे. ठरावीक मुदतीत उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्याच्या प्रक्रियेतूनच २०४७ च्या लक्ष्याकडे वाटचाल करता येईल, हा संदेश पंतप्रधान मोदी यांनी या संवादातून दिला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा