34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरबिजनेसहल्दीरामचा १० हजार कोटींचा आयपीओ येणार?

हल्दीरामचा १० हजार कोटींचा आयपीओ येणार?

२०२७ अखेरपर्यंत लिस्टिंगचे नियोजन

Google News Follow

देशातील प्रसिद्ध स्नॅक्स आणि मिठाई उत्पादक कंपनी हल्दीराम स्नॅक्स फूडने शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने प्रस्तावित आयपीओच्या तयारीला सुरुवात केली असून, यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनी EY ची प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस म्हणून नियुक्ती केली आहे. या आयपीओचा आकार सुमारे १० हजार कोटी रुपये (जवळपास १ अब्ज डॉलर) असण्याची शक्यता आहे. कंपनीचे संभाव्य मूल्यांकन एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकते. कंपनी २०२७ च्या अखेरीस शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.

आयपीओची प्रक्रिया व्यवस्थापित करणे, नियामक नियमांचे पालन आणि कंपनीच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, ही जबाबदारी EY पार पाडणार आहे. हल्दीरामचा व्यवसाय अनेक विभागांमध्ये विस्तारलेला असल्याने आयपीओची प्रक्रिया तुलनेने गुंतागुंतीची आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा ते बारा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. प्रस्तावित आयपीओमध्ये विद्यमान भागधारकांकडून शेअर्सची विक्री आणि कंपनीकडून नवीन शेअर्स जारी करून भांडवल उभारणी, अशा दोन्ही पर्यायांचा समावेश असू शकतो. मात्र, आयपीओचा अंतिम आकार आणि रचना अद्याप निश्चित झालेली नाही.
हे ही वाचा:
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

नोएल टाटा सहा कंपन्यांच्या संचालक मंडळातून निवृत्त

दोन हजारांचे ऑनलाइन कर्ज काढणाऱ्या महिलेला ओढले जाळ्यात

प्रत्यक्ष कर संकलनातून सरकारी तिजोरीत १४.४२ लाख कोटींची भर

हल्दीरामच्या मालकीमध्ये जागतिक गुंतवणूकदारांचाही मोठा वाटा आहे. दिल्लीस्थित हल्दीराम स्नॅक्स आणि नागपूरस्थित हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल यांच्या विलीनीकरणातून हल्दीराम स्नॅक्स फूडची स्थापना झाली. टेमासेक, अल्फा वेव्ह ग्लोबल आणि एल कॅटरटन यांसारख्या गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे. २०२५ मधील गुंतवणूक व्यवहारांनंतर कंपनीचे मूल्यांकन सुमारे ८५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. संस्थापक अग्रवाल कुटुंबाकडे कंपनीतील ८५ टक्के हिस्सेदारी होती.

दरम्यान, कंपनीची आर्थिक कामगिरीही मजबूत असल्याचे दिसते. क्रिसिल रेटिंग्सच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ७,७६२ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला असून, ऑपरेटिंग मार्जिन सुमारे १९ टक्के राहिले. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये महसुलात ९ ते १० टक्के वाढ अपेक्षित आहे. भारतातील पॅकेज्ड स्नॅक्स बाजारपेठेचा विस्तार आणि अमेरिका तसेच पश्चिम आशियातील भारतीय खाद्यपदार्थांची वाढती मागणी कंपनीसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे हल्दीरामचा संभाव्य आयपीओ भारतीय शेअर बाजारातील मोठ्या सार्वजनिक समभाग विक्रींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा