31 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरराजकारणसोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन ९६० रुपयांत विकणारा लोखंडे निलंबित

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन ९६० रुपयांत विकणारा लोखंडे निलंबित

 मंदिर महासंघाच्या लढ्याला यश

Google News Follow

अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारा तहसीलदार विजय लोखंडे याला महसूल विभागाने निलंबित केले आहे. लोखंडे याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत, योग्य चौकशी न करता आणि साक्ष-पुरावे व उलट तपास न घेता अत्यंत घाईघाईने हा एकतर्फी निर्णय दिला होता. या अत्यंत गंभीर प्रशासकीय अनियमिततेची दखल घेत शासनाने त्यांना निलंबित केले असून त्यांच्यावर पुढील विभागीय चौकशीची कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

या प्रकरणाचे मूळ म्हणजे, सदर देवस्थानची जमीन मनपा हद्दीत असल्याने व संस्थानकडे कायदेशीर सूट प्रमाणपत्र असल्याने तेथे ‘कुळ कायदा’ लागूच होत नाही. असे असतानाही लोखंडे याने कुळ कायद्याचा बेकायदेशीर आधार घेत ही जमीन त्रयस्थ व्यक्तीच्या नावे करून, बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी ती जाणीवपूर्वक ‘वर्ग-१’ (भोगवटदार) मध्येच ठेवली होती. मात्र, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि संस्थानच्या विश्वस्तांनी तातडीने आक्षेप घेत ही जमीन ‘वर्ग-२’ केली व बिल्डर लॉबीला होणारे हस्तांतरण रोखले. महासंघाच्या या पाठपुराव्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी (SDO) हा बेकायदेशीर खरेदी आदेश पूर्णतः रद्द केला असून सद्यस्थितीत देवस्थानची मालकी अबाधित आहे.

हे ही वाचा:

भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा लवकरच

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक

भारताच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये मोठी झेप

गोरेगावात पकडले तीन कोटींचे कोकेन

तहसीलदार लोखंडेच्या या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात मंदिर महासंघाच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष मुद्दा उपस्थित करून तक्रार करण्यात आली होती. या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही वरिष्ठ पातळीवर अनेक तक्रारी प्रलंबित होत्या, ज्याची एकत्रित दखल घेत शासनाने ही धडक कारवाई केल्याची दाट शक्यता आहे. देवस्थानची कोट्यवधींची संपत्ती हडप करू पाहणाऱ्या एका भ्रष्ट अधिकाऱ्यावर शासनाने केलेल्या या निलंबनाच्या कारवाईबद्दल मंदिर महासंघाने आणि विश्वस्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा