32 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरदेश दुनियाट्रम्प, जिनपिंग, पुतीन यांची पहिली त्रिपक्षीय बैठक

ट्रम्प, जिनपिंग, पुतीन यांची पहिली त्रिपक्षीय बैठक

अण्वस्त्र नियंत्रणासह इराण युद्धावरही चर्चा होण्याची शक्यता

Google News Follow

अमेरिका, चीन आणि रशिया या तीन प्रमुख अण्वस्त्रधारी देशांच्या प्रमुखांची पहिली त्रिपक्षीय बैठक पुढील आठवड्यात चीनमध्ये होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन १९ नोव्हेंबर रोजी शेनझेन येथे आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) परिषदेदरम्यान एकत्र येणार आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या ऑलिव्हिया वेल्स यांनी या बैठकीची माहिती दिली.

जागतिक अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे आणि अण्वस्त्रांची संख्या कमी करणे हा बैठकीतील प्रमुख मुद्दा असेल. मात्र, या चर्चेतून तातडीने कोणताही करार होण्याची अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केलेली नाही. अण्वस्त्र नियंत्रणाबाबत भविष्यात व्यापक चर्चा सुरू करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरू शकते.

अमेरिकेला अण्वस्त्र नियंत्रणाच्या चर्चेत चीनचाही सहभाग हवा आहे. मात्र, अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत चीनकडे कमी अण्वस्त्रे असल्याने बीजिंगने अशा चर्चेत सहभागी होण्याबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही. दरम्यान, अमेरिका आणि रशियादरम्यानचा शेवटचा अण्वस्त्र नियंत्रण करार ‘न्यू स्टार्ट’ची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपली. नव्या करारात चीनचाही समावेश असावा, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे.

या बैठकीत इराणमधील युद्धावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या इराणविरोधातील लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना चीन आणि रशियाशी चर्चा करायची आहे. मात्र, रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता कमी असल्याचे अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप

हलाल मांस न विकण्यावरून लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंट मालकाला धमक्या

पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी

नांदेडमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी यापूर्वी चर्चेच्या तयारीचे संकेत दिले होते. ट्रम्प १८ नोव्हेंबरला चीनमध्ये दाखल होणार असून, जिनपिंग यांच्यासोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या त्रिपक्षीय बैठकीकडे जागतिक राजकारण आणि अण्वस्त्र नियंत्रणाच्या दृष्टीने लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा