32 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरविशेष३६ तासांनंतर मायक्रोसॉफ्टची सेवा पूर्ववत

३६ तासांनंतर मायक्रोसॉफ्टची सेवा पूर्ववत

७० हून अधिक देशांतील वापरकर्त्यांना फटका

Google News Follow

मायक्रोसॉफ्टच्या जगभरातील सेवांमध्ये निर्माण झालेला तांत्रिक बिघाड तब्बल ३६ तासांनंतर दूर करण्यात कंपनीला यश आले आहे. आउटलुक, मायक्रोसॉफ्ट टीम्स, कोपायलट आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ मधील अन्य सेवा पुन्हा पूर्ववत झाल्या आहेत. ७० हून अधिक देशांतील वापरकर्त्यांना या बिघाडाचा फटका बसला होता. शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी कंपनीने सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली.

गुरुवारी, १२ नोव्हेंबरला आउटलुकच्या ई-मेल सेवेत अडचणी येण्यास सुरुवात झाली. वापरकर्त्यांना इनबॉक्स उघडणे, ई-मेल पाठवणे आणि प्राप्त करणे यामध्ये अडथळे येत होते. त्यानंतर या समस्येचा परिणाम टीम्स, कोपायलट, शेअरपॉइंट, प्लॅनर आणि टु डू यांसारख्या सेवांवरही झाला. टीम्सवरील संदेश आणि ऑनलाइन बैठका बहुतांश सुरू होत्या; मात्र कॅलेंडर आणि बैठकींचे नियोजन करणाऱ्या सुविधांमध्ये अडचणी आल्या.

मायक्रोसॉफ्टच्या तपासणीत हा बिघाड आधीच्या नेटवर्क क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. अलीकडे करण्यात आलेल्या नेटवर्क बदलानंतर ही समस्या समोर आली. हा सायबर हल्ला किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रकार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

या बिघाडामुळे व्यावसायिक संस्था, सरकारी कार्यालये आणि विमान कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला. भारतात इंडिगोच्या ई-मेल ग्राहकसेवेत अडथळे आले. एअर इंडियाने मात्र ई-मेल सेवा दुसऱ्या मार्गाने वळवून ग्राहकांशी संपर्क सुरू ठेवला. कंपनीने सेवा एकाच वेळी सुरू न करता टप्प्याटप्प्याने पूर्ववत केल्या. तसेच, विलंबाने पाठवले गेलेले ई-मेल पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

हे ही वाचा:

ट्रम्प, जिनपिंग, पुतीन यांची पहिली त्रिपक्षीय बैठक

‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप

हलाल मांस न विकण्यावरून लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंट मालकाला धमक्या

पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी

मायक्रोसॉफ्टने या गैरसोयीबद्दल ग्राहकांची माफी मागितली असून, नेमका बिघाड कसा झाला आणि भविष्यात अशी समस्या टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार, याचा सविस्तर अहवाल तपासानंतर प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा