32 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरबिजनेसअदानी समूहाने ९९ टक्के खर्च कपातीचा आरोप फेटाळला

अदानी समूहाने ९९ टक्के खर्च कपातीचा आरोप फेटाळला

५६.७५ कोटींचा आकडा केवळ सर्वेक्षणासाठी

Google News Follow

अदानी समूहाच्या तळारी जलविद्युत प्रकल्पाच्या खर्चावरून निर्माण झालेल्या वादावर कंपनीने स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहेत. प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ९९ टक्के कपात करून ५,६७५ कोटी रुपयांचा खर्च ५६.७५ कोटी रुपयांवर आणल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, हे आरोप पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने म्हटले आहे. कंपनीने अधिकृत निवेदन जारी करत प्रकल्पाच्या खर्चात कोणतीही अनियमितता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, वन्यजीव विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर सादर करण्यात आलेला प्रस्ताव हा केवळ जागेची पाहणी आणि सर्वेक्षणासाठी होता. राज्य वन्यजीव मंडळाने प्रकल्पाचा एकूण खर्च ५,६७५ कोटी रुपये विचारात घेतला होता. त्यापैकी ५६.७५ कोटी रुपये ही रक्कम केवळ पाहणी आणि सर्वेक्षणासाठी प्रस्तावित होती. ही रक्कम एकूण प्रकल्प खर्चाच्या सुमारे एक टक्का असल्याने तिला संपूर्ण प्रकल्पाची किंमत समजणे चुकीचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
हे ही वाचा:
ट्रम्प, जिनपिंग, पुतीन यांची पहिली त्रिपक्षीय बैठक

कांद्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले

भारताच्या परकीय चलनसाठ्यात २.४९ अब्ज डॉलरची वाढ

‘छावा’ला मागे टाकत ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप

पर्यावरणीय परिणामांच्या आरोपांवरही अदानी समूहाने भूमिका मांडली आहे. तळारी पंप्ड स्टोरेज प्रकल्प खासगी आणि बिगर-वन जमिनीवर प्रस्तावित असून तो कोयना वन्यजीव अभयारण्यापासून ३.२ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच हा प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिसूचित बफर क्षेत्राबाहेर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. व्याघ्र भ्रमणमार्ग किंवा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रावर प्रकल्पाचा परिणाम होणार नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकल्पाची किंमत ९९ टक्क्यांनी कमी दाखवून कंपनीने भरावयाची २२७ कोटी रुपयांची रक्कम अवघ्या २.२७ कोटी रुपयांवर आणल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हा आरोपही फेटाळला आहे. ५६.७५ कोटी रुपये ही केवळ सर्वेक्षण आणि जागेच्या पाहणीसाठीची तरतूद असल्याचे कंपनीने सांगितले. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चासह पर्यावरणीय मंजुरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता अधिक चर्चेत आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा