32 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरक्राईमनामादिवाळीत फटाक्यांवरून मुंबईत ८० हून अधिक गुन्हे दाखल

दिवाळीत फटाक्यांवरून मुंबईत ८० हून अधिक गुन्हे दाखल

अनधिकृत फटाके विक्रेत्यांवरही कारवाई

Google News Follow

दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरात ८० हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारींसह रात्रीच्या गस्तीदरम्यान नियमभंग आढळल्यानंतर पोलिसांनी स्वतःहूनही गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवरही स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे.

दादर, कुर्ला, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात ४ ते ९ नोव्हेंबरदरम्यान परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री करणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्याने पादचारी, वाहनचालक आणि आसपासच्या मालमत्तांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

लाल किल्ला स्फोटाच्या कटात सहभाग नसल्याचा मुजम्मिल, शाहीनचा दावा

ब्रिटनमध्ये ७० मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम बिलाल काझीला ३० वर्षांची शिक्षा

भारताच्या परकीय चलनसाठ्यात २.४९ अब्ज डॉलरची वाढ

डॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना वन इंडिया पुरस्कार

ही कारवाई पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) यांनी २ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार तसेच मुंबई महापालिकेच्या शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ९ नोव्हेंबरच्या आदेशानुसार करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा