32 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरक्राईमनामाहनीट्रॅपमध्ये अडकला हवाई दलाचा अधिकारी

हनीट्रॅपमध्ये अडकला हवाई दलाचा अधिकारी

अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात पाक हँडलरला दिली माहिती

Google News Follow

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित हँडलरने पाठवलेल्या अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात भारतीय हवाई दलाच्या एका विंग कमांडरने देशाच्या गोपनीय युद्धयोजनांची माहिती दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब उघड झाली. संबंधित अधिकाऱ्याने ड्रोन युनिटची क्षमता, लढाऊ विमानांची तैनाती आणि लष्करी सरावाची माहिती पाकिस्तानी हँडलरला दिल्याचा आरोप आहे. तसेच पाच सहकाऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्पायवेअर टाकण्यासही मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

आरोपपत्रानुसार, १२ जानेवारी ते १ एप्रिल २०२६ या काळात विंग कमांडरचा पाकिस्तानी हँडलरशी व्हॉट्सअपवरून संपर्क होता. हँडलरने अश्लील छायाचित्र पाठवल्यानंतर अधिकाऱ्याने हवाई दलाच्या गोपनीय युद्धयोजनेतील एका पानाची माहिती पाठवली. प्रत्येक छायाचित्राच्या बदल्यात युद्धयोजनेच्या कागदपत्रातील एक पान देण्याची तयारीही त्याने दर्शवली होती.

अधिकाऱ्याने हवाई दलाच्या गोपनीय ड्रोन युनिटची संख्या, रचना, कार्यपद्धती, चाचण्या, उड्डाण क्षमता आणि लक्ष्यभेद प्रणालीची माहिती दिल्याचा आरोप आहे. याशिवाय लेहमधील लढाऊ विमानांची तैनाती आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजवरील लष्करी सरावाची माहितीही हँडलरला दिली. पाकिस्तानी हँडलरने पाठवलेल्या मालवेअर आणि स्पायवेअरयुक्त ऍप्स व लिंकच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिकाऱ्याने आपल्या हाताखालील पाच सहकाऱ्यांच्या मोबाईल आणि इतर उपकरणांमध्ये स्पायवेअर इन्स्टॉल करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

देव दीपावलीसाठी ११ लाख दिव्यांनी उजळणार काशी

दिवाळीत फटाक्यांवरून मुंबईत ८० हून अधिक गुन्हे दाखल

लाल किल्ला स्फोटाच्या कटात सहभाग नसल्याचा मुजम्मिल, शाहीनचा दावा

ब्रिटनमध्ये ७० मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम बिलाल काझीला ३० वर्षांची शिक्षा

पोलिसांच्या तपासात व्हॉट्सअपवरून ३ हजार ८ संदेश, ६५ छायाचित्रे, ४२ व्हॉइस कॉल, चार व्हिडिओ कॉल आणि सहा लिंकची देवाणघेवाण झाल्याचे आढळले. कार्यालयात स्मार्टफोन नेल्याप्रकरणी १ एप्रिल रोजी तपासणी झाली आणि प्रकरण उघडकीस आले. संबंधित अधिकाऱ्याला मे महिन्यात अटक करण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा