32 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरराजकारणउत्तराखंडमध्ये काँग्रेस आमदाराने माईक फेकला, खुर्चीने केली मारहाण

उत्तराखंडमध्ये काँग्रेस आमदाराने माईक फेकला, खुर्चीने केली मारहाण

जौलजीबी मेळाव्यात गोंधळ, मुख्यमंत्री पुष्कर धामी निघून गेल्यामुळे संताप

Google News Follow

उत्तराखंडमधील पिठोरागढ जिल्ह्यात शनिवारी, १४ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक जौलजीबी मेळाव्यात राजकीय वादातून गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसचे आमदार हरीश धामी यांनी संतापाच्या भरात माईक फेकला, व्यासपीठाची तोडफोड केली आणि एका व्यक्तीला खुर्चीने मारहाण केली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दहा दिवस चालणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर ते कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यानंतर हा प्रकार घडला. भारत-तिबेट सीमेच्या जवळ काली आणि गोरी नद्यांच्या संगमावर हा ऐतिहासिक मेळावा भरवण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये धारचुला मतदारसंघाचे आमदार हरीश धामी ध्वनियंत्रणा सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी माईक फेकून दिला. त्यानंतर त्यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या गोंधळादरम्यान खुर्च्या आणि व्यासपीठावरील साहित्यही फेकण्यात आले.

हरीश धामी हे स्वतः या मेळाव्याचे अध्यक्ष आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही आणि आपण भाषण करण्याचा प्रयत्न करत असताना आपला माईक जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, “मी या मेळाव्याचा अध्यक्ष आहे. तरीही मला बोलण्याची किंवा स्थानिक नागरिकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी देण्यात आली नाही. स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी आपण भाषण करू इच्छित होतो, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये नुकत्याच मृत्यू झालेल्या आठ वर्षांच्या मुलीचा प्रश्न तसेच कनार परिसरातील रस्ते जोडणीच्या समस्येचा समावेश होता.

हे ही वाचा:

ललित मोदी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक

होर्मुझच्या सामुद्रधुनीत भीषण स्फोटामुळे तीन तेलवाहू जहाजांना आग

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा चौक्यांवर हल्ला

तीन वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारत दौऱ्यावर

दरम्यान, काँग्रेसने आपल्या आमदाराची पाठराखण केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या गरिमा दसौनी यांनी मुख्यमंत्री आणि मेळाव्याच्या आयोजकांवर टीका केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक आमदाराकडे असताना त्यांना व्यासपीठावरून बोलण्याची संधी न देणे म्हणजे प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे, भाजपने आमदार हरीश धामी यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात वापरण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह भाषेवर भाजपने आक्षेप घेतला असून, आमदारांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते महेंद्र सिंह बुडियाल यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, धारचुला मतदारसंघातील काँग्रेसचा जनाधार कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांचे हे वर्तन असल्याचा दावा केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा