27 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरबिजनेसअमेरिकेत डिझेलच्या दरात मोठी घसरण

अमेरिकेत डिझेलच्या दरात मोठी घसरण

दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर किंमत

Google News Follow

पश्चिम आशियातील युद्धजन्य तणाव कमी होण्याचे संकेत मिळताच जागतिक इंधन बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत डिझेलच्या सरासरी दरात घसरण झाली असून, दोन महिन्यांनंतर प्रथमच डिझेलचे दर प्रति गॅलन ६ डॉलरच्या खाली आले आहेत. गॅसबडीच्या आकडेवारीनुसार, शनिवारी अमेरिकेतील डिझेलचा सरासरी किरकोळ दर ५.९९८ डॉलर प्रति गॅलन नोंदवण्यात आला. केवळ डिझेलच नव्हे, तर पेट्रोलचे दरही १० ऑगस्टनंतर प्रथमच प्रति गॅलन ४ डॉलरच्या खाली आले आहेत. त्यामुळे महागाईचा सामना करणाऱ्या अमेरिकी नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही महिन्यांत अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत सुरू असलेला संघर्ष तसेच रशियाच्या रिफायनरींवर युक्रेनकडून झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेलपुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी अमेरिकेत डिझेलच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला. ३ सप्टेंबरला डिझेलचा दर ५.८२० डॉलरवर पोहोचला होता. त्यानंतर १० सप्टेंबरला तो ६ डॉलरच्या पुढे गेला, तर २२ सप्टेंबरला प्रति गॅलन ६.५१९ डॉलर या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. कॅलिफोर्नियामध्ये तर मर्यादित रिफायनरी क्षमता आणि कठोर इंधन नियमांमुळे डिझेलचे दर काही काळासाठी १० डॉलरच्या पुढे गेले होते.
हे ही वाचा:
ललित मोदी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक

दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० पार

मुंबईत सीएनजीच्या दरात दिड रूपयांनी वाढ

कोकणातल्या तीन सुवर्णकिनाऱ्यांवर ‘निळा झेंडा’ |

इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका मालवाहतूक, शेती आणि व्यावसायिक क्षेत्राला बसला. वाहतुकीचा खर्च वाढल्याने वस्तूंच्या किमतींवरही दबाव निर्माण झाला. या परिस्थितीत ट्रम्प प्रशासनाने कृषी आणि औद्योगिक वापरासाठीच्या डिझेलवरील संघीय करात तात्पुरती सवलत दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी ८ अब्ज डॉलरच्या मदत कार्यक्रमाची घोषणा केली होती. मात्र, जागतिक बाजारातील पुरवठ्याच्या चिंतेमुळे या उपाययोजना पुरेशा ठरल्या नाहीत.

आता परिस्थितीत बदल होत असून, गेल्या दोन आठवड्यांत ब्रेंट क्रूडच्या वायदे किमतीत १८.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. शरद ऋतूमध्ये वाहनांचा वापर कमी होणे, वादळांचा हंगाम संपणे आणि रिफायनरींची देखभाल पूर्ण होऊन उत्पादन पूर्वपदावर येणे, ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. मात्र, पश्चिम आशियातील परिस्थिती आणि जागतिक तेलपुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेता इंधन दरातील ही घसरण किती काळ टिकते, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा