32 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरस्पोर्ट्सअखेरच्या षटकात आर्यवीर सेहवागच्या तोंडी होता 'सीताराम'चा जप

अखेरच्या षटकात आर्यवीर सेहवागच्या तोंडी होता ‘सीताराम’चा जप

वडील वीरेंद्र सेहवागसोबतचा व्हिडिओ व्हायरल

Google News Follow

अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा युवा फलंदाज आर्यवीर सेहवाग याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. भारताला आशिया चषकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या या थरारक विजयाचा आनंद अद्याप त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. याचदरम्यान वडील आणि भारताचे माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉलमधील त्याचा संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

वीरेंद्र सेहवाग यांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. मुलाचे अभिनंदन करताना वीरेंद्र सेहवाग यांनी त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी आर्यवीरने पाकिस्तानी प्रेक्षकांकडून ‘सेहवाग… सेहवाग’ अशा घोषणा दिल्या जात असल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे सांगितले. अंतिम सामन्याच्या अखेरच्या क्षणी निर्माण झालेल्या तणावाबद्दलही आर्यवीरने वडिलांना सांगितले. भारताला विजयासाठी धावांची गरज असताना आपण मन शांत ठेवण्यासाठी सातत्याने ‘सीताराम… सीताराम’ असा जप करत होतो, असे त्याने सांगितले.

व्हिडिओ कॉलमध्ये आर्यवीर म्हणाला, “शेवटच्या षटकात मी सतत ‘सीताराम… सीताराम’ म्हणत होतो. आम्ही सर्वजण कसेही करून एक चौकार मिळावा, अशी आशा करत होतो आणि अखेर शेवटच्या चेंडूवर चौकार मिळाला.” या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानने दिलेल्या ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी तीन धावांची आवश्यकता होती. अशा निर्णायक क्षणी मोहम्मद उल्वा याने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हे ही वाचा:

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीने गाठला नवा उच्चांक!

शाकाहारी थाळी १२ टक्क्यांनी महागली

नवा प्रवास सुरू सेनाभवन ते टिळकभवन |

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे परवाने निलंबित

आर्यवीर सेहवागने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पाच डावांमध्ये ९०.२५ च्या सरासरीने एकूण ३६१ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यात त्याने १६० धावांची शानदार खेळी केली. ही या स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्यानंतर मलेशियाविरुद्ध नाबाद ७० धावा आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ५१ धावांची खेळी केली.

पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने ६१ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पाकिस्तानचा गोलंदाज अली रझाने त्याच्या हाताच्या कोपराजवळ चेंडू मारल्याने त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. मात्र, त्याने फलंदाजी सुरू ठेवली आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली.

विशेष म्हणजे, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आर्यवीरने विराट कोहलीच्या प्रसिद्ध सेलिब्रेशनची नक्कल केली. २०१८ मध्ये पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५ वे कसोटी शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीने केलेली ‘बॅटनेच उत्तर देईन’ ही कृती आर्यवीरने मैदानावर साकारली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा