31 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरस्पोर्ट्सब्रिटनचे राजपुत्र विल्यम- सचिन तेंडुलकर खेळले 'गल्ली क्रिकेट'

ब्रिटनचे राजपुत्र विल्यम- सचिन तेंडुलकर खेळले ‘गल्ली क्रिकेट’

Google News Follow

ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम यांनी मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्यासोबत गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यादेखील उपस्थित होत्या. त्यांनीही फलंदाजी करत क्रिकेटचा आनंद लुटला.

प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट यांनी खास उभारण्यात आलेल्या चहाच्या स्टॉलवर कुल्हडमधील चहाचाही आस्वाद घेतला. त्यानंतर प्रिन्स विल्यम शाळकरी मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळताना दिसले. यावेळी सचिन तेंडुलकरही त्यांच्यासोबत उपस्थित होता. गल्ली क्रिकेटशी संबंधित विविध गोष्टींची माहिती सचिन त्यांना देताना दिसला. प्रिन्स विल्यम यांनी फलंदाजी करत काही चांगले फटकेही लगावले. त्यानंतर सचिननेही फलंदाजीचा आनंद घेतला.

प्रिन्सेस केट मिडलटन यांनीही फलंदाजी केली. यावेळी सचिन त्यांना गोलंदाजी करताना दिसला. प्रिन्स विल्यम यांनीदेखील केट यांना गोलंदाजी केली. गल्ली क्रिकेटमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रिन्सेस केट यांनी सचिनसोबत संवाद साधला.

हे ही वाचा:

भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेचा आकार ९ अब्ज डॉलरच्या पुढे

भारत- इजिप्तमध्ये वाहतूक, पुरवठा, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात संधी

कुलगाममध्ये लष्करच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा

“काँग्रेसला आणखी ३० वर्षे सत्तेपासून दूर राहावे लागेल”

यावेळी पत्रकारांशी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला, “दहा वर्षांपूर्वी मी आणि प्रिन्स विल्यम क्रिकेट खेळण्यासाठी भेटलो होतो, तेव्हा मी त्यांना सांगितले होते की, सध्या आपण मैदानावरील क्रिकेट खेळत आहोत; पण पुढच्या वेळी आपण एकत्र गल्ली क्रिकेट खेळू. ते आज येथे आले, त्यांनी गल्ली क्रिकेट खेळले आणि मुलांसोबत बराच वेळ घालवला. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”

प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी ते मुंबईत दाखल झाले. हे शाही दाम्पत्य १७ नोव्हेंबर रोजी अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यातही सहभागी होणार आहे. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दोघेही नवी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

विल्यम आणि केट यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी २०१६ मध्ये त्यांनी भारताला भेट दिली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा