31 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरस्पोर्ट्सन्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताची खरी 'अग्निपरीक्षा'

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताची खरी ‘अग्निपरीक्षा’

आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक

Google News Follow

टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाची कामगिरी शानदार राहिली. भारताने एकदिवसीय मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. मात्र, क्रिकेटच्या सर्वात मोठ्या आणि आव्हानात्मक प्रकारात म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये आता भारतीय संघाची खरी परीक्षा पाहिली जाणार आहे.

न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय संघाचा कसोटीतील इतिहास फारसा चांगला राहिलेला नाही. भारताने आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये एकूण २५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी भारतीय संघाला केवळ ५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असून, उर्वरित १० सामने अनिर्णित राहिले आहेत.

२०२० मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा अखेरचा दौरा केला होता. त्यावेळी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०२४ मध्ये न्यूझीलंडने भारतात येऊन यजमान संघाला ०-३ अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले होते.

वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या न्यूझीलंडच्या परिस्थितीत भारतीय फलंदाजांसाठी कसोटी मालिकेत धावा करणे मोठे आव्हान ठरणार आहे. भारतीय फलंदाजीची मुख्य जबाबदारी शानदार फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार शुभमन गिलच्या खांद्यावर असेल. त्याला यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांच्याकडून साथ मिळण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

कुलगाममध्ये लष्करच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा

ब्रिटनचे राजपुत्र विल्यम- सचिन तेंडुलकर खेळले ‘गल्ली क्रिकेट’

जेन्सेन हुआंगना एनव्हिडियाच्या सीईओपदी विराजमान करण्याची तयारी

भूपेश बघेल यांच्या मुलाच्या ३५५ भूखंडांवर ईडीचा ताबा

भारताच्या सध्याच्या कसोटी संघातील फारच कमी खेळाडूंना न्यूझीलंडमधील परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे. मात्र, भारत-अ संघाकडून खेळताना ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी चांगली कामगिरी केली होती.

वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. त्याला आकाशदीप, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची साथ मिळणार आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्याच्या अगदी आधी गुरनूर बरार याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नितीश कुमार रेड्डी याच्यावर फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी असेल.

कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टन येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्याला २७ नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे सुरुवात होईल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा