33 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरविशेषभारत-आसियान देशांचे संबंध स्थैर्यासाठी महत्त्वाचे

भारत-आसियान देशांचे संबंध स्थैर्यासाठी महत्त्वाचे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फिलिपिन्समध्ये वक्तव्य

Google News Follow

जगाने गेल्या काही वर्षांत एकापाठोपाठ अनेक संकटांचा सामना केला आहे. अशा परिस्थितीत आज जगाला शांतता, स्थैर्य आणि भविष्यातील घडामोडींबाबत निश्चिततेची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे मंगळवारी झालेल्या २३ व्या भारत-आसियान शिखर परिषदेत ते बोलत होते. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि आसियान यांच्यातील संबंध हे हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्यासाठी महत्त्वाचे आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि आसियान देशांची भागीदारी आता केवळ सामायिक संस्कृती आणि वारशापुरती मर्यादित राहिलेली नाही. डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण आणि अवकाश यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्येही सहकार्याचा विस्तार होत आहे. भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणामुळे गेल्या काही वर्षांत भारत-आसियान संबंधांना नवी गती आणि खोली मिळाली आहे.

भविष्य स्पर्धेने नव्हे, तर सहकार्याने घडले पाहिजे

भारत आणि आसियान मिळून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या दोन्ही भागीदारांचे भविष्य स्पर्धेच्या नव्हे, तर सहकार्याच्या आधारावर घडले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंकडे यासाठी आवश्यक क्षमता आणि दृढनिश्चय असून, एकत्रित प्रयत्नांतून हा प्रदेश शांतता आणि स्थैर्याचे प्रतीक बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या शिखर परिषदेची ‘नेव्हिगेटिंग अवर फ्युचर टुगेदर’ ही संकल्पनाही याच विचाराला अधोरेखित करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, २०१४ पासून भारताने लोकांमधील परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी १०० हून अधिक उपक्रम राबवले आहेत. तसेच सुमारे २५० क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्ट्स सुरू केले असून, कौशल्य विकासासाठी १० हजारांहून अधिक शिष्यवृत्ती दिल्या आहेत. भारत आणि आसियानमधील नऊ देशांदरम्यान सुरू असलेल्या थेट विमानसेवा आणि वाढता पर्यटनव्यवहार हेही उभय बाजूंमधील जवळीक वाढत असल्याचे संकेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

लोकलमधील वादाचा निष्पाप प्रवाशाला फटका!

पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली निवृत्त वकिलाला चार कोटींचा गंडा

भारताचा विकास आणि आसियान देशांची समृद्धी एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. आगामी काळात आसियान कम्युनिटी व्हिजन २०४५ आणि विकसित भारत २०४७ ही उद्दिष्टे सामायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. भारताची आसियानची एकता आणि मध्यवर्ती भूमिका यांना असलेली बांधिलकी कायम राहील, असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा