30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरस्पोर्ट्सधडाकेबाज खेळाडू आर्यवीर सेहवागने घेतले धीरेंद्र शास्त्रींचे दर्शन

धडाकेबाज खेळाडू आर्यवीर सेहवागने घेतले धीरेंद्र शास्त्रींचे दर्शन

भविष्यातील क्रिकेट वाटचालीसाठी घेतले आशीर्वाद

Google News Follow

आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांना हैराण करणारे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा आर्यवीर सेहवागही क्रिकेटच्या मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे. अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत त्याची ही क्षमता संपूर्ण क्रिकेटविश्वाला पाहायला मिळाली. आपल्या फलंदाजीतील कौशल्य आणि आक्रमक फटक्यांच्या जोरावर आर्यवीरने वडिलांप्रमाणेच आपल्यातही मोठा फलंदाज बनण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे.

दरम्यान, अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर आर्यवीर सेहवागने सोमवारी बागेश्वर धाम येथे भेट दिली. यावेळी त्याने बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीची छायाचित्रे बागेश्वर धाम सरकारच्या सोशल मीडिया खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये भारताचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागही दिसत आहेत.

हे ही वाचा:

डॉलरच्या तुलनेत रुपयाची दमदार उसळी

भारत-आसियान देशांचे संबंध स्थैर्यासाठी महत्त्वाचे

मायक्रोसॉफ्टनंतर अमेरिकेतील बँका आणि विमानसेवा विस्कळीत

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिन तेंडुलकरची ‘बॅटोग्राफी’

बागेश्वर धाम सरकारच्या सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘मुलतानचा सुलतान’ म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचे सुपुत्र आणि भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आर्यवीर सेहवाग याने आशिया चषक २०२६ मध्ये पाकिस्तानला पराभूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) पुरस्कार मिळवल्यानंतर तो सरकारचे आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह बागेश्वर धाम येथे पोहोचला.

धीरेंद्र शास्त्री यांनी आर्यवीर सेहवाग याला आयुष्याच्या प्रवासात ठाम राहण्याचा आणि कर्तव्यनिष्ठ बनण्याचा आशीर्वाद दिला. या विशेष प्रसंगी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा