28 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरक्राईमनामापळून गेलेला जखमी दहशतवादी लतीफ भट अखेर ठार

पळून गेलेला जखमी दहशतवादी लतीफ भट अखेर ठार

शरण येण्याचे आवाहन फेटाळल्यानंतर सुरक्षा दलांची कारवाई

Google News Follow

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील सीआरपीएफच्या चौकीवर गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याचा संशयित असलेला लश्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी लतीफ भट, बुधवारी मशिदीत झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. त्याला शरण येण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्याने शरणागती पत्करण्यास नकार दिल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई केली.

लतीफ भटचा ठावठिकाणा समजल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला होता. यावेळी भट मशिदीत लपल्याचे स्पष्ट झाले. त्याला बाहेर येऊन शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारेही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शरण येण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अखेर या कारवाईत भट मारला गेला.

दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी कुलगाममधील अखरन येथे सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात भटचा सहभाग असल्याचा आरोप होता. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. हल्ल्यापूर्वी भट आणि त्याचा साथीदार उमर निसार दार यांनी मीर बाजार, अखरन, हाबलीश आणि किलम या भागांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले होते. या प्रकरणातील उमर निसार दार याला १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षा दलांकडून भटचा शोध सुरू होता.

हे ही वाचा:

ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला २७ वर्षांची शिक्षा

मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले

सरकार तुमचे सिस्टीम आमची हे १२ वर्षांनंतरही कायम ?

मनातून माफी नको, मनापासून माफी मागा!

भट हा काश्मीर खोऱ्यातील सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांपैकी एक महत्त्वाचा कमांडर मानला जात होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भट १८ नोव्हेंबर २०२५ रोजी लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला. तो मोठ्या प्रमाणात स्वयंघोषित कट्टरतावादी बनला होता आणि त्याला शांतता, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेत अडथळा आणण्याच्या सूचना सीमेपलीकडून मिळाल्या होत्या. त्याच्यावर अनंतनागमध्ये २२ जुलै रोजी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात सहभाग असल्याचाही आरोप होता. तसेच कुलगाममध्ये दोन स्थलांतरित मजुरांच्या हत्येप्रकरणीही तो संशयित होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा