28 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसॅमचा, सत्यनारायण झाला, की जनरल हसन?

सॅमचा, सत्यनारायण झाला, की जनरल हसन?

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे काँग्रेसमध्ये आग लागण्याची शक्यता आहे. मोदींनी सॅम पित्रोदा यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पित्रोदाने त्याचे प्रेमपूर्वक उत्तर दिले. एवढे पुरे नव्हते की काय, या ट्वीटबाबत वृत्तवाहीन्यांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या मतापासून त्यांनी फारकत घेतलेली दिसली. हे जे काही घडते आहे, त्याची पडद्या आडची कारणे वेगळीच असण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी एका बाजूला ‘बिलाँगिंग’च्या निमित्ताने त्यांच्या बाजूने वातावरण बनवण्याचा प्रयत्न करत असताना मोदींनी त्यावर पाणी ओतले आहे. ‘मोदी औपचारीक बोलतात, डोळ्यात डोळे घालून पाहत नाहीत’, असा दावा सोनियांनी त्यांच्या आत्मचरीत्रात केलेला असताना पित्रोदांनी मोदींसाठी दयाळू, दिलदार, अशी विशेषणे उधळली आहेत. सोनिया त्यांच्या आत्मचरीत्रात मोदींबाबत काय म्हणाले, हे जेव्हा निवेदिकेने त्यांना सांगितले तरीही पित्रोदा ठाम राहीले. ‘ते सोनियांचे मत असू शकते. प्रत्येकाचे मत वेगळे असते’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या फोन टॅपिंगच्या दाव्याबाबतही पित्रोदांनी हीच भूमिका घेतली. ‘पंतप्रधान कोणाचा फोन टॅप करत नाहीत’, असे विधान करून त्यांनी राहुल गांधी यांची गोची करून टाकली.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा