28 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरदेश दुनियारशियाचे लष्करी विमान कोसळून १९ जणांचा मृत्यू

रशियाचे लष्करी विमान कोसळून १९ जणांचा मृत्यू

तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा अंदाज

Google News Follow

रशियाचे लष्करी मालवाहू विमान सायबेरियातील केमेरोव्हो परिसरात कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात विमानातील सर्व १९ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) रात्री ही दुर्घटना घडली. अपघाताचे प्राथमिक कारण तांत्रिक बिघाड असल्याचा अंदाज रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

माहितीनुसार, अँटोनोव्ह एएन-१२ (Antonov An-12) हे लष्करी मालवाहू विमान केमेरोव्हो शहराजवळील यागुनोवो गावाच्या परिसरात कोसळले. मॉस्कोपासून सुमारे तीन हजार किलोमीटर अंतरावर हा भाग आहे. विमान नियोजित उड्डाणावर असताना ही दुर्घटना घडली. विमानात कर्मचारी वर्गासह एकूण १९ जण होते. या दुर्घटनेत कोणीही बचावले नसल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळण्यापूर्वी विमानाला आग लागली होती. त्यानंतर विमान वेगाने खाली आले आणि जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला. अपघातानंतर घटनास्थळी आग लागली होती. केमेरोव्होचे गव्हर्नर इल्या सेरेद्युक यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाने विमानाच्या अवशेषांना लागलेली आग विझवली असून बचाव आणि मदतकार्य पूर्ण करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सीआरपीएफ चौकीवरील हल्ल्यातील संशयित लष्कर कमांडर लतीफ भट ठार

ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला २७ वर्षांची शिक्षा

मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले

सरकार तुमचे सिस्टीम आमची हे १२ वर्षांनंतरही कायम ?

अँटोनोव्ह एएन-१२ हे सोव्हिएत काळात विकसित करण्यात आलेले चार इंजिनांचे लष्करी मालवाहू विमान आहे. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून या विमानाचा वापर सुरू झाला. सैनिक, शस्त्रास्त्रे आणि अन्य लष्करी साहित्याची वाहतूक करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. जगभरात या प्रकारची एक हजाराहून अधिक विमाने तयार करण्यात आली होती. त्यापैकी काही विमाने आजही विविध देशांमध्ये सेवेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा