30 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरविशेषभेंडी बाजारातील दाऊदचे घर जमीनदोस्त!

भेंडी बाजारातील दाऊदचे घर जमीनदोस्त!

कडेकोट बंदोबस्तात दाऊदच्या घरावर कारवाई

Google News Follow

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी साम्राज्याची साक्षीदार राहिलेली भेंडी बाजारातील वादग्रस्त इमारत अखेर इतिहासजमा होणार आहे. पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदचे वडिलोपार्जित घर आणि कार्यालय असलेली ‘हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना’ ही इमारत जमीनदोस्त करण्याची जोरदार तयारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात १८ नोव्हेंबर रोजी या धोकादायक इमारतीवर महापालिकेचा बुलडोझर चालवला गेला.

भेंडी बाजार हा मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचा आणि ऐतिहासिक परिसर आहे. येथील पाकमोडिया लेनमधील ही इमारत ८० वर्षांहून अधिक जुनी असून तिची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. इमारतीच्या भिंती आणि छत कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करण्यात आली असून, ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.

हे ही वाचा:

सावरकरांच्या केलेल्या अपमानावरून शिवसेनेने सोनियांचे पुस्तक फाडले

राहुल गांधी हे मेंदू दिव्यांग

जावेद अख्तर म्हणतात, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम

राहुल गांधी अमेरिकेत पुन्हा बरळले

महापालिकेने इमारतीची पाहणी केल्यानंतर ती धोकादायक असल्याचे समोर आले. उच्च न्यायालयातही याबाबत याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने महापालिकेला आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेने अधिकृत नोटीस काढून इमारत तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली असून, पोलिस आणि महापालिका कर्मचारी तैनात राहतील.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या कटाचे केंद्र

या इमारतीला गुन्हेगारी विश्वाचा मोठा आणि काळा इतिहास आहे. हे दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर आहे आणि १९८६ मध्ये भारतातून पलायन करण्यापूर्वी तो आणि त्याचे कुटुंब याच इमारतीत राहत होते. याच इमारतीत दाऊद इब्राहिमचे घर आणि कार्यालय होते, जिथे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात आला होता. बीएमसीने इमारत पाडण्यासाठी १८ आणि १९ नोव्हेंबर, २०२६ या तारखा निश्चित केल्या होत्या. बीएमसीच्या ‘सी’ वॉर्डने १६ नोव्हेंबर, २०२६ रोजी एक नोटीस जारी करून, ही इमारत ‘सी-१’ श्रेणीतील, अत्यंत जीर्ण आणि धोकादायक असल्याचे घोषित केले आणि ती पाडण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या ३१ ऑगस्ट, २०२० च्या आदेशानुसार, ही कारवाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात केली जाईल.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा