30 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरसंपादकीयराहुल गांधी कोणाच्या मांडीवर बसले आहेत?

राहुल गांधी कोणाच्या मांडीवर बसले आहेत?

Google News Follow

प्रत्येक क्षेत्रात देशाच्या अर्थकारणाचे चमकदार आकडे येत आहेत. जगाच्या तुलनेत भारत आर्थिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतोय, असा विश्वास जागतिक वित्तसंस्था व्यक्त करत आहेत. तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेरिका दौऱ्यात भारताच्या अर्थकारणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, असे विधान करावेसे वाटते, ही बाब गंभीर आहे. जीडीपीच्या शर्यतीत भारत चीनला मागे टाकणार, अशी चर्चा असताना राहुल गांधी ही विधाने का करत आहेत? वडिलांच्या मांडीवर कोण बसायचे, हे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. राहुल कोणाच्या मांडीवर बसून ही विधाने करत आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जग त्यांना गंभीरपणे घेत असेल का? त्यांच्या बोलण्याचा नेमका काय परिणाम होतो आहे, याचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक आहे. त्यांची विधाने बिनडोक असली तरीही त्याला उत्तर देणे भाग आहे.

राहुल गांधी बहुचर्चित अमेरिका दौऱ्यावर आहेत. कोलंबिया विद्यापीठात एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अकलेचे तारे तोडले आहेत. लिडीया पॉलग्रीन या महिला पत्रकाराने ही मुलाखत घेतली. भारताबाबत सतत नकारात्मक लिखाण करणाऱ्या विदेशातील डाव्या-लिब्रांडू टोळीत लिडीया यांचे नाव येते. राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यानिमित्त या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात. भारताला पाण्यात पाहणारे, हिंदूंचा द्वेष करणारे, संघ-भाजपाच्या नावाने बोटे मोडणारे लोक राहुल गांधी यांच्या आसपास दिसतात. त्यामुळे त्यांची ताजी भेट त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही.

गोल्डमन सॅक्स, मूडीज, वर्ल्ड बँक, आयएमएफ आदी जागतिक वित्तसंस्थांच्या तज्ज्ञांना मूर्खात काढण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. जाहीर कार्यक्रमात आपल्या आई-वडिलांबाबत काय सांगावे, काय सांगू नये, याची समज ज्याला वयाची ५६ वर्षे उलटल्यानंतरही आली नाही, त्याला भारताच्या अर्थकारणाची समज असेल असे मानणे हाच मुळात मूर्खपणा आहे. ज्यांना भारतद्वेषाचा कंड शमवायचा असतो, त्यांच्यासाठी राहुल गांधींची अमेरिका भेट ही पर्वणीच असते. ज्यांना भारताची बरबादी हवी आहे, ते राहुल यांच्या पालख्या खांद्यावर घ्यायला तयार असतात.
हे ही वाचा:
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

राहुल गांधी हे सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत. मुसोलिनीची चाकरी केल्यामुळे तुरुंगात गेलेल्या फॅसिस्ट आजोबाचे नातू आहेत, त्यामुळे खोटे बोलणे हे त्यांच्या रक्तात आहे. ते विधाने करतात, परंतु त्याच्या पुष्ट्यर्थ ते कधीही आकडेवारी देत नाहीत. राहुल गांधी म्हणत आहेत म्हणून माना डोलावणारे फक्त दोनच प्रजातीचे लोक आहेत. एक तर सुप्रिया श्रीनेत किंवा पवन खेरा यांच्यासारखे लोंबते म्हणजेच मंद भक्त किंवा मोदींबद्दल आणि देशाबद्दल वाईट ऐकून समाधानी होणारे नतद्रष्ट.

अर्थकारणाच्या प्रांतात देशाची प्रगती होते की अधोगती, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इंधनाचा खप, विक्रीचे आकडे, डिजिटल पेमेंटचे व्यवहार, निर्यातीचे आकडे, करसंकलनाचे आकडे, लोकांचे दरडोई उत्पन्न हे काही ठोकताळे जगभरातील अर्थतज्ज्ञांकडून वापरले जातात. अर्थक्षेत्रात ज्यांच्या मताला किंमत आहे, असे तमाम तज्ज्ञ भारताबाबत अत्यंत आशावादी विधाने करत असताना राहुल गांधी मात्र कायम पेटका आल्यासारखे बोंबलत असतात. त्यात माहितीचा भाग कमी आणि मोदीद्वेषाचा जास्त आहे. कदाचित भारताच्या शत्रूंकडून त्यांना सुपाऱ्याही मिळत असतील.

भारताच्या अर्थकारणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, असे म्हणणे म्हणजे कतरीना कैफ, रकुल प्रीत, तमन्ना भाटिया, स्कारलेट जोहान्सन, जेनिफर लॉरेन्स यांना विद्रूप म्हणण्यासारखे आहे. सोनू निगम, उदित नारायण यांना बेसूर म्हणण्यासारखे आहे. ज्यांना चांगले-वाईट, सुंदर-कुरूप यांच्यातला फरक कळत नाही, त्यांच्या मेंदूचा वेग अतिमंद झाला आहे, यावर विश्वास ठेवावाच लागतो.

भारतात बेरोजगारी वाढते आहे, असा दावा राहुल गांधी करत आहेत. ऑक्टोबर २०२६ चे आकडे सांगत आहेत, देशाचा एकूण बेरोजगारी दर घसरून ४.९% झाला आहे. वार्षिक आधारावरही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये रोजगाराच्या प्रमाणात सुधारणा झाली असून महिलांचा सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात शहरांच्या तुलनेत बेरोजगारी कमी आहे.

याच काळात अमेरिकेत हा दर ४.१ टक्के होता आणि चीनमध्ये ५.२ टक्के. ही आकडेवारी पाहिल्यावर राहुल गांधी भारताची स्थिती काय आहे, हे सांगत नसून भारतात काय व्हावे, याबाबत अपेक्षा व्यक्त करत आहेत, हे स्पष्ट होते. भारताच्या अर्थकारणाचा बट्ट्याबोळ व्हावा, बेरोजगारी वाढावी, अराजक निर्माण व्हावे, भाजपाचे सरकार जावे आणि आपल्या हाती पुन्हा देशाची लूट करण्यासाठी सत्ता यावी, ही त्यांची इच्छा आहे.

वर्ल्ड बँकेच्या ताज्या अहवालानुसार, भारतात दारिद्र्यरेषेखालील लोकांचा टक्का २०११ ते २०२३ या काळात २७.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आला आहे. गेल्या १२ वर्षांत ४९.६० कोटी लोक दारिद्र्यरेषेखालून वर आले आहेत.

देशाच्या निर्यातीचे ताजे आकडे तर चकित करणारे आहेत.

चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर २०२६), मागील आर्थिक वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत भारताची एकूण निर्यात १६.६६% ने वाढली आहे. ही वाढ ८१.२५ अब्ज डॉलर इतकी आहे.

२०२६-२७ मध्ये एकूण निर्यात अगदी सहज १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. २०२५-२६ मध्ये झालेल्या ८६३.१ अब्ज डॉलरच्या विक्रमी निर्यातीच्या तुलनेत हा आकडा १५.८६% म्हणजेच १३६.९ अब्ज डॉलर जास्त असेल. हे शक्य झाले कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चौकटीपलीकडचा विचार करण्याची क्षमता आहे. भारत गरजेच्या तुलनेत ८७ टक्के तेलाची आयात करतो. असा देश काही काळ युरोपला डिझेल निर्यात करणारा क्रमांक एकचा देश बनला. अमेरिकेकडे तेलाचे प्रचंड साठे आहेत, तरीही अमेरिकेने भारताकडून डिझेल आयात केले. गेल्या काही वर्षांत भारत डिझेलच्या निर्यातीबाबत स्वतःचेच विक्रम मोडताना दिसत आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आपण पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत ४७ टक्के भर टाकली आहे. हे चमत्कारापेक्षा कमी नाही. भारताच्या या कामगिरीमुळे जगातील अनेक देशांनी तोंडात बोटे घातली आहेत. यात तेल उत्पादक देशांचाही समावेश आहे.

राहुल गांधी हे नकारात्मक विचारांनी भरलेले आहेत. जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा भारताबाबत कायम दुर्गंधी येते. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेवर राहुल गांधी यांनी सातत्याने टीका केली. कोलंबिया विद्यापीठातही देशातील उत्पादन क्षेत्राची पुनर्रचना करण्याची आणि त्याला बळ देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले आहे. यांना देशात काय सुरू आहे, हे ठाऊकच नाही. जो देश पूर्णपणे मोबाईल आयात करायचा, तो आता जगातील क्रमांक एकचा निर्यातदार झाला आहे.

चालू आर्थिक वर्षात आपली इलेक्ट्रॉनिक्सची निर्यात ४६.९२ टक्क्यांनी वाढली आहे. हे काय उत्पादन क्षेत्राला बळकटी आल्याशिवाय झाले आहे का? प्रत्येक क्षेत्रात हे आकडे दमदार आहेत. इंजिनिअरिंग वस्तूंच्या निर्यातीत आपण २२ टक्क्यांची भर टाकली आहे. प्रचंड मागणी असलेल्या ऑरगॅनिक केमिकल क्षेत्रात आपली निर्यात १८ टक्क्यांनी वाढली आहे. भारताच्या अंतराळ अर्थकारणाचा आकार ९ अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. दिवाळीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांनी १.४० लाख कोटींची विक्रमी उलाढाल केली. दिवाळीच्या काळात झालेली एकूण विक्री ५ लाख कोटींची होती. चालू आर्थिक वर्षात भारताचे थेट करसंकलन १४.४२ लाख कोटी झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ११.७६ टक्क्यांची भर पडली आहे. मूडीज रेटिंग्जने भारताच्या विकासदराचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर नेला आहे. गोल्डमन सॅक्सने २०२७ च्या अंदाजात चीनच्या तुलनेत भारताला झुकते माप दिले आहे. चीनचा विकासदर ४.५ टक्के, तर भारताचा ७.२ टक्के असेल, असे भाकीत वर्तवले आहे. ही आकडेवारी राहुल गांधी यांचे तोंड काळे करण्यासाठी पुरेशी आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा