29 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरविशेषजगाला वेड लावणाऱ्या ‘GTA 6’च्या निर्मितीत १,६०० भारतीयांचा हात

जगाला वेड लावणाऱ्या ‘GTA 6’च्या निर्मितीत १,६०० भारतीयांचा हात

गेममधील ओपन वर्ल्ड, डिजिटल वातावरण भारतीयांनी घडवले

Google News Follow

जगातील सर्वाधिक प्रतीक्षित व्हिडिओ गेमपैकी एक असलेल्या ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ६’ (GTA 6) च्या निर्मितीत भारतीय गेम डेव्हलपर्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या गेमच्या निर्मितीसाठी बंगळुरूमधील रॉकस्टार इंडियाच्या स्टुडिओतील १,६०० हून अधिक डेव्हलपर्सनी योगदान दिल्याची माहिती समोर आली आहे. गेममधील विस्तीर्ण ओपन वर्ल्ड, डिजिटल वातावरण आणि विविध ठिकाणांच्या निर्मितीत या टीमचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडियावरून भारतीय डेव्हलपर्सच्या या योगदानाकडे लक्ष वेधले आहे.

रॉकस्टार इंडियाच्या व्हाइटफिल्ड येथील स्टुडिओमध्ये सुमारे १,६१५ डेव्हलपर्स कार्यरत असल्याचे वृत्त आहे. या टीमने अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यापासून प्रेरित असलेल्या काल्पनिक ‘लिओनिडा’ या गेमविश्वाच्या निर्मितीत काम केले. त्यातील ‘व्हाइस बीच’ या महत्त्वाच्या ठिकाणाच्या निर्मितीतही भारतीय टीमचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. याशिवाय गेममधील विविध डिजिटल वस्तू, परिसर आणि वातावरण तयार करण्याची जबाबदारीही या टीमने सांभाळली.

एका कॉम्प्युटरपासून जागतिक गेमिंगपर्यंतचा प्रवास

बंगळुरूच्या गेमिंग क्षेत्राचा इतिहास १९९५ पर्यंत जातो. राजेश राव यांनी त्यावेळी अवघ्या एका कॉम्प्युटरच्या मदतीने ‘ध्रुवा इंटरएक्टिव्ह’ या गेम डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना केली. ही भारतातील सुरुवातीच्या गेमिंग स्टुडिओंपैकी एक ठरली. २०१९ मध्ये रॉकस्टार गेम्सने या कंपनीचे अधिग्रहण केले. त्यानंतर भारतीय डेव्हलपर्सना जागतिक स्तरावरील मोठ्या गेम प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. याच टीमने यापूर्वी ‘ग्रँड थेफ्ट ऑटो ५’ आणि ‘रेड डेड रिडेम्प्शन २’ या लोकप्रिय गेमच्या निर्मितीतही योगदान दिले आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे वडिलोपार्जित घर पेटवले

धर्मांतर नव्हे जन्मदरामुळे १० वर्षात मुस्लिम ख्रिश्चनांना मागे टाकणार

दोन आठवड्यांत ‘रामायण’ने कमावले १,५०० कोटी

ब्रह्मोसनंतर आता आकाश, पिनाकाच्या खरेदीत फिलिपाइन्सला स्वारस्य

भारतात गेम डेव्हलपमेंट क्षेत्राचा विस्तार होत असून, देशात १,९०० हून अधिक गेम डेव्हलपमेंट कंपन्या आणि सुमारे १.३० लाख कर्मचारी असल्याचा गेम डेव्हलपर असोसिएशन ऑफ इंडियाच्या २०२६ च्या अहवालात उल्लेख आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा