29 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरविशेषधर्मांतर नव्हे जन्मदरामुळे १० वर्षात मुस्लिम ख्रिश्चनांना मागे टाकणार

धर्मांतर नव्हे जन्मदरामुळे १० वर्षात मुस्लिम ख्रिश्चनांना मागे टाकणार

हिंदूंचा जागतिक लोकसंख्येतील वाटा घटणार

Google News Follow

जगातील सर्वाधिक अनुयायी असलेल्या धर्मांच्या क्रमवारीत पुढील दहा वर्षांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. धर्मांतरामुळे नव्हे, तर प्रामुख्याने जन्मदरातील तफावतीमुळे मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असून, २०३५ पर्यंत मुस्लिमांची संख्या ख्रिश्चन धर्मीयांपेक्षा अधिक होऊ शकते. प्यू रिसर्च सेंटरच्या नव्या अहवालातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम लोकसंख्येचा वाढता जन्मदर आणि तुलनेने तरुण लोकसंख्या ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्यू रिसर्च सेंटरने २०२० ते २०७० या कालावधीतील धार्मिक लोकसंख्येचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, २०२० मध्ये जगभरात ख्रिश्चन धर्मीयांची लोकसंख्या २.२७ अब्ज, तर मुस्लिमांची लोकसंख्या २.०२ अब्ज होती. मात्र, २०३५ पर्यंत मुस्लिमांची संख्या २.५७ अब्ज, तर ख्रिश्चनांची संख्या २.५२ अब्ज होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुस्लिम लोकसंख्या ख्रिश्चनांना मागे टाकू शकते.

अहवालानुसार, २०२० ते २०२५ या काळात मुस्लिम महिलांचा सरासरी प्रजननदर ३.१ मुले प्रति महिला होता. ख्रिश्चन महिलांमध्ये हे प्रमाण २.५, तर अन्य धर्मीय महिलांमध्ये १.६ होते. त्यामुळे धर्मांतरापेक्षा जन्मदराचा मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीत अधिक वाटा असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

२०७० पर्यंत मुस्लिम लोकसंख्या ३.६४ अब्ज

सध्याचे कल कायम राहिल्यास २०७० पर्यंत मुस्लिम लोकसंख्या ३.६४ अब्ज, तर ख्रिश्चन लोकसंख्या २.९६ अब्ज होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, हिंदूंची संख्या १.१८ अब्जांवरून १.३८ अब्जांपर्यंत वाढेल; मात्र जागतिक लोकसंख्येतील त्यांचा वाटा १४.९ टक्क्यांवरून १३.६ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. बौद्ध धर्मीयांची संख्या ३२ कोटींवरून २५ कोटींपर्यंत कमी होऊ शकते.

हे ही वाचा:

ब्रह्मोसनंतर आता आकाश, पिनाकाच्या खरेदीत फिलिपाइन्सला स्वारस्य

सावरकरांच्या केलेल्या अपमानावरून शिवसेनेने सोनियांचे पुस्तक फाडले

राहुल गांधी हे मेंदू दिव्यांग

जावेद अख्तर म्हणतात, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम

आफ्रिकेतही धार्मिक लोकसंख्येचे चित्र बदलणार

२०७० पर्यंत उप-सहारा आफ्रिकेत जगातील निम्म्याहून अधिक ख्रिश्चन राहण्याचा अंदाज आहे. काँगो हा सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या असलेला देश ठरू शकतो. तसेच पाकिस्तान जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल, असा अंदाज आहे. हे सर्व निष्कर्ष सध्याचे जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर आणि धर्मांतराचे कल कायम राहतील या गृहितकावर आधारित आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा