29 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरविशेषGTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा

GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा

विविध क्षेत्रांतील प्रगतीचा गेमिंगच्या माध्यमातून आढावा

Google News Follow

जगभरातील गेमर्स ज्या ‘ग्रँड थेफ्ट ऑटो-६’ (GTA-6) या व्हिडिओ गेमची आतुरतेने वाट पाहत होते, तो गेम गुरुवारी (१९ नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. या गेमच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या गेल्या १३ वर्षांतील विकासाचा आढावा मांडला आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या GTA-5 पासून ते २०२६ मधील GTA-6 पर्यंतच्या कालावधीची तुलना करत त्यांनी विविध क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचे चित्र मांडले. ‘भारत आता एक नवा खेळ खेळत आहे’, असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अर्थव्यवस्था, गरिबी निर्मूलन, आर्थिक समावेशन, स्वच्छता, डिजिटल कनेक्टिव्हिटी, सौरऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान आणि नक्षलवाद अशा क्षेत्रांतील बदल अधोरेखित केले आहेत. २०१३ मध्ये भारताचा समावेश ‘फ्रॅजाइल फाइव्ह’ अर्थव्यवस्थांमध्ये होता. आता भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, अत्यंत गरिबीचे प्रमाण २७ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा दावा करण्यात आला आहे.

स्वच्छतेच्या क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेची व्याप्ती ३९ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. देशाची सौरऊर्जा क्षमता २.८२ गिगावॅटवरून १७५ गिगावॅटपर्यंत वाढली आहे. अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढल्याचेही या पोस्टमधून दाखवण्यात आले आहे. २०१३ मध्ये देशात केवळ एक अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप होते, तर आता त्यांची संख्या ४४० झाली आहे.

रेल्वे विद्युतीकरणातही मोठी वाढ झाल्याचे पोस्टमध्ये नमूद आहे. २०१३ मध्ये २० टक्के असलेले रेल्वे विद्युतीकरण आता ९९.६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत इंटरनेटचा खर्च कमी झाल्याचे उदाहरण देण्यात आले आहे. ३जीच्या काळात एक जीबी डेटासाठी ३०८ रुपये मोजावे लागत होते, तर ५जीच्या काळात हाच खर्च ७.५१ रुपयांपर्यंत कमी झाल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

ट्रम्प यांच्या पक्षाला पैसा पुरवणे मूर्खपणा

जगाला वेड लावणाऱ्या ‘GTA 6’च्या निर्मितीत १,६०० भारतीयांचा हात

बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे वडिलोपार्जित घर पेटवले

धर्मांतर नव्हे जन्मदरामुळे १० वर्षात मुस्लिम ख्रिश्चनांना मागे टाकणार

संरक्षण क्षेत्रात भारत पूर्वी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आयात करणारा देश होता; आता ८० हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात करत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे. याशिवाय, नक्षलवादामुळे प्रभावित जिल्ह्यांची संख्या १८२ वरून शून्यावर आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्राचाही पोस्टमधील चित्रफितीत उल्लेख आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा