30 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरविशेषआंध्र-तेलंगणाच्या सीमेवर मोठा कट उधळला; ६७० ग्रेनेड शेल जप्त

आंध्र-तेलंगणाच्या सीमेवर मोठा कट उधळला; ६७० ग्रेनेड शेल जप्त

माओवाद्यांचा बारूदखाना सुरक्षा दलांच्या हाती

Google News Follow

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये माओवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेशातील रामपाचोडावरम जिल्ह्यातील जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या माओवादविरोधी मोहिमेदरम्यान पोलिस आणि सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके तसेच माओवाद्यांशी संबंधित साहित्य जप्त केले आहे.

आंध्र प्रदेश स्पेशल पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत ६७० जिवंत बॅरल ग्रेनेड लॉन्चर (बीजीएल) शेल, ४२ नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर, २५० ग्रॅम स्फोटक पावडर, कॉर्डेक्सच्या २५ वाती, १२ स्फोटक रिंग, सात जिवंत भरमार बंदुकीच्या काडतुसे, ६२ मिमी मोर्टारचे १६ रिकामे खोल, सहा मीटर फ्यूज वायर तसेच वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माओवादी कॅडरने आपल्या कारवायांसाठी या साहित्याचा वापर करण्याच्या उद्देशाने ते जंगल परिसरात लपवून ठेवले होते.

पोलावरम जिल्ह्यातील दुर्गम जंगल भागात राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान हा साठा आढळून आला. या मोहिमेत स्पेशल पोलिस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि अन्य सुरक्षा दलांचे जवान सहभागी झाले होते. या कारवाईसंदर्भात अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.दरम्यान, तेलंगणा राज्यातही पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत माओवाद्यांचा मोठा स्फोटकसाठा जप्त केला आहे. भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील तेलंगणा-छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) बटालियनने लपवून ठेवलेल्या तीन ठिकाणांवरून २८० बीजीएल शेल जप्त करण्यात आले.

पुजारी कांकेर गावाजवळ १६ नोव्हेंबर रोजी चार्ला पोलिसांनी शोधमोहीम राबविली होती. या मोहिमेत विशेष पथकाचे जवान आणि बॉम्बशोधक व नाशक पथक सहभागी झाले होते. आत्मसमर्पण केलेल्या माजी माओवादी सदस्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित संघटनेने जंगल परिसरात कोणत्या ठिकाणी स्फोटके आणि अन्य साहित्य लपवून ठेवले आहे, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती.

हे ही वाचा:

अग्निवीरवायूंना आता योगाचे धडे!

अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!

अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!

इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी

या माहितीच्या आधारे पोलिसांनी पीएलजीए बटालियनशी संबंधित तीन गुप्त ठिकाणांचा शोध घेतला आणि तेथून २८० बीजीएल शेल जप्त केले.आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या या कारवायांमुळे माओवादी संघटनांनी जंगल परिसरात लपवून ठेवलेल्या शस्त्रसाठ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सुरक्षा दलांकडून या भागात शोधमोहीम आणि माओवादविरोधी कारवाया सुरू आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा