31 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरराजकारणइस्रायलवरून राहुल गांधींची पलटी

इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी

भारताशी चांगले संबंध असल्याचे म्हणत शस्त्रखरेदीचे केले समर्थन

Google News Follow

इस्रायलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेत आता बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. भारताचे इस्रायलसोबत चांगले संबंध आहेत आणि त्या देशाकडून शस्त्रखरेदी करणे योग्य असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी इस्रायलच्या गाझामधील लष्करी कारवाईवरून त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे राहुल गांधींच्या ताज्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात आयोजित ‘द इराण वॉर अँड इंडियाज रोल इन द वर्ल्ड’ या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भारत-इस्रायल संबंधांवर भाष्य केले. “इस्रायलसोबत आमचे संबंध आहेत आणि ते चांगले आहेत. आम्ही इस्रायलकडून शस्त्रे खरेदी करतो, ही चांगली गोष्ट आहे,” असे ते म्हणाले. भारताची लोकसंख्या सुमारे दीडशे कोटी असल्याचा उल्लेख करताना, भारताचे परराष्ट्र धोरण दुसऱ्या देशाच्या हितापेक्षा भारताच्या हितावर आधारित असले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

इस्रायलवरील हमासच्या ७ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या हल्ल्याचा निषेध करताना राहुल गांधी म्हणाले की, ती घटना अत्यंत भयावह होती आणि असे कधीही घडायला नको होते. मात्र, त्यानंतर गाझामध्ये जे घडत आहे, त्याचाही निषेध केला पाहिजे.

हे ही वाचा:

GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा

ट्रम्प यांच्या पक्षाला पैसा पुरवणे मूर्खपणा

जगाला वेड लावणाऱ्या ‘GTA 6’च्या निर्मितीत १,६०० भारतीयांचा हात

बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे वडिलोपार्जित घर पेटवले

याच वर्षी २७ जून रोजी राहुल गांधी यांनी त्यांच्या आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा गाझाविषयक लेख सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी भारत इस्रायलच्या रणनीतिक प्रभावक्षेत्रात अधिक खोलवर जात असल्याची टीका त्यांनी केली होती. पंतप्रधानांचा इस्रायल दौरा हा आश्चर्यकारक रणनीतिक निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पॅलेस्टिनी नागरिकांच्या बाजूने भारताने आवाज उठवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा