31 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरबिजनेसअमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर भारताच्या तेल खरेदीचे गणित बदलले

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर भारताच्या तेल खरेदीचे गणित बदलले

ओमान-दुबई क्रूडचा वाटा वाढला

Google News Follow

जागतिक राजकीय घडामोडींचे पडसाद आता ऊर्जा बाजारात उमटू लागले आहेत. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर डेमोक्रॅट्सची सरशी झाल्याने पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल, डिझेल, नैसर्गिक वायू, एलएनजी आणि कोळशाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. संभाव्य युद्धाचा धोका आणि तेलपुरवठ्यातील अडथळ्यांच्या शक्यतेमुळे बाजारात समाविष्ट झालेला ‘रिस्क प्रीमियम’ कमी होऊ लागला आहे. त्याचबरोबर तेलवाहू जहाजांच्या भाड्यातही घट झाली आहे.

मध्यपूर्वेतून चीनकडे कच्चे तेल वाहून नेणाऱ्या मोठ्या तेलवाहू जहाजांचे भाडे ऑक्टोबरमध्ये प्रतिदिन १४ लाख डॉलरवर पोहोचले होते. मात्र, आता ते घसरून जवळपास १० लाख डॉलरवर आले आहे. दुसरीकडे, ऑक्टोबरच्या अखेरीस प्रति बॅरल ११५ डॉलरच्या आसपास असलेले ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर आता ९५ डॉलरच्या खाली आले आहेत. वर्षअखेरीस जागतिक तेलपुरवठा मागणीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हेही किमती घसरण्यामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे. युरोपमधील नैसर्गिक वायूच्या किमतीही प्रति मेगावॅट तास १०४ युरोंवरून ८४ युरोंपर्यंत खाली आल्या आहेत.

हे ही वाचा:
चार चाकी वाहन विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा

ट्रम्प यांच्या पक्षाला पैसा पुरवणे मूर्खपणा
जागतिक बाजारातील या घसरणीचा थेट परिणाम भारताच्या कच्च्या तेलाच्या बास्केटवर झाला आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलच्या (पीपीएसी) आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२६ मध्ये भारताच्या क्रूड बास्केटची सरासरी किंमत प्रति बॅरल ९५.८४ डॉलर झाली आहे. ऑक्टोबरमधील ११९.९१ डॉलरच्या तुलनेत ही घसरण जवळपास २०.१ टक्के आहे. ऑक्टोबरमध्ये पश्चिम आशियातील तणाव, समुद्री विम्याचा वाढलेला खर्च आणि मालवाहतुकीच्या वाढलेल्या दरांमुळे भारताच्या क्रूड बास्केटची किंमत १२३.७२ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली होती. मार्च २०१२ नंतरची ही सर्वोच्च पातळी होती. मात्र, १६ नोव्हेंबरपर्यंत हा दर घसरून ९२.७४ डॉलर प्रति बॅरलवर आला आहे.

दरम्यान, भारताच्या कच्च्या तेलाच्या बास्केटमधील विविध तेलप्रकारांच्या प्रमाणातही बदल झाला आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रेंट डेटेड अर्थात स्वीट क्रूडचा वाटा ६५.२७ टक्क्यांवरून कमी होऊन ५३.४९ टक्क्यांवर आला आहे. याउलट, ओमान आणि दुबई क्रूडचा एकत्रित वाटा वाढून ४६.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षातील हा ओमान-दुबई क्रूडचा सर्वाधिक, तर ब्रेंट क्रूडचा सर्वांत कमी वाटा आहे. त्यामुळे भारताच्या तेल खरेदीच्या रचनेतही बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक बाजारातील किमतींची घसरण कायम राहिल्यास भारताच्या कच्च्या तेलाच्या आयात खर्चावरील दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा