30 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरविशेषरोहित पवारांनीही अजितदादांसोबत व्हीएसआर विमानातून केला प्रवास

रोहित पवारांनीही अजितदादांसोबत व्हीएसआर विमानातून केला प्रवास

कंपनीवर आरोप कशासाठी असा सवाल, अजितदादांचा ८५ वेळा दौरा

Google News Follow

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीच्या विमानांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही याच कंपनीच्या विमानातून अजितदादांसोबत प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर केलेल्या आरोपांवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, अपघातापूर्वीच्या १४ महिन्यांत अजित पवार यांनी तब्बल ८५ वेळा व्हीएसआरच्या विमानातून प्रवास केल्याची आकडेवारीही समोर आली आहे.

वृत्तानुसार, ८ डिसेंबर २०२४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत अजित पवार यांनी एकूण १०४ वेळा चार्टर विमानातून प्रवास केला. त्यापैकी ८५ प्रवास व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या विमानांतून, तर उर्वरित १९ प्रवास अन्य कंपन्यांच्या विमानांतून झाले. म्हणजेच या कालावधीत अजित पवार यांच्या एकूण चार्टर विमान प्रवासांपैकी सुमारे ८२ ते ८३ टक्के प्रवास व्हीएसआरच्या विमानांतून झाले होते.

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील विमान व्हीएसआर कंपनीचे बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ होते. अपघातानंतर रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानांच्या देखभालीसह सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. तसेच, या प्रकरणाच्या तपासावरून त्यांनी राज्य सरकारवरही आरोप केले होते.

हे ही वाचा:

अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!

अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!

इस्रायलवरून राहुल गांधींची पलटी

GTA-5 ते GTA-6; मोदींनी मांडला भारताच्या विकासाचा १३ वर्षांचा लेखाजोखा

मात्र, आता समोर आलेल्या प्रवासाच्या आकडेवारीनुसार, अजित पवार अपघातापूर्वीच्या काळात सातत्याने व्हीएसआरच्या विमानांचा वापर करत होते. याशिवाय, रोहित पवार यांनीही अजितदादांसोबत याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्हीएसआर कंपनीच्या विमानसेवेचा वापर केवळ अजित पवारच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील आणि राजकीय वर्तुळातील अन्य व्यक्तीही करत असल्याचे या वृत्तातून समोर आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा