30 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरविशेषयोगी आदित्यनाथ यांना मातृशोक

योगी आदित्यनाथ यांना मातृशोक

सावित्री देवींनी ९१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावित्री देवी यांची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी हरिद्वार येथे नेले जाण्याची शक्यता असून, शनिवारी (२१ नोव्हेंबर) अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सावित्री देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आईचे प्रेम, आशीर्वाद आणि माया ही आयुष्यातील सर्वांत मौल्यवान संपत्ती असल्याचे सांगत, त्यांचे निधन कुटुंबासाठी कधीही भरून न निघणारे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थना केली. दरम्यान, आईच्या निधनाची बातमी मिळूनही योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील नियोजित कार्यक्रम सुरू ठेवले. युवक कल्याण आणि सार्वजनिक सेवेला प्राधान्य देत त्यांनी आपले कार्यक्रम पूर्ण केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा