31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरक्राईमनामामाकडवाला कंपाउंडमध्ये छाप्यानंतर घरात सापडला घातक शस्त्रांचा साठा

माकडवाला कंपाउंडमध्ये छाप्यानंतर घरात सापडला घातक शस्त्रांचा साठा

विनोद पवार हत्या प्रकरणात आणखी तिघे पोलिसांच्या जाळ्यात

Google News Follow

कुर्ला पश्चिम येथील माकडवाला कंपाउंड परिसरात सुरू असलेल्या हत्यासत्रासह वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत विनोद पवार हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली असून, परिसरातील घरांमधून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय अभिलेखावरील गुन्हेगारांची धरपकडही करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

कुर्ला पश्चिम येथील सुमारे तीन एकर परिसरात माकडवाला कंपाउंड ही वस्ती पसरली आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथील काही कुटुंबांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद तसेच आर्थिक आणि सामाजिक वर्चस्वाच्या संघर्षातून या वादांना हिंसक वळण मिळत असल्याचे समोर आले आहे. किरकोळ भांडणांपासून सुरू होणारे वाद एकमेकांना मारहाण, प्राणघातक हल्ले आणि थेट हत्येपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या दशकभरात या परिसरात चार जणांची हत्या झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

कुर्ल्यातील उद्यानात मुस्लिम मुलांचा तरुण-तरुणीवर प्राणघातक हल्ला

हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ

काल ‘मृत’ अर्थव्यवस्था, आज भारत अमेरिकेसाठी आदर्श!

गंगा पाणीवाटप करार विसर्जनाच्या वाटेवर?

काही दिवसांपूर्वी विनोद पवार (४०) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यापूर्वी काही आरोपींना अटक केली होती. दरम्यान, या परिसरात घातक शस्त्रे लपवून ठेवली जात असून, त्यांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित ताड यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाईचे नियोजन केले. परिमंडळ सातमधील विविध पोलीस ठाण्यांच्या मदतीने दहा पथके तयार करण्यात आली. सुमारे १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग होता.

गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी संपूर्ण माकडवाला कंपाउंड परिसराला वेढा घालून कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. या वेळी सुमारे २५ ते ३० घरांची झडती घेण्यात आली. त्यात तलवारी, चॉपर, कोयते, सुरे अशा विविध प्रकारच्या घातक शस्त्रांचा मोठा साठा आढळून आला. या शस्त्रांप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान, विनोद पवार हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पासलवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिसरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या अचानक कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा